Breaking News

बंजारा समाजाचे धर्मगुरू संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची २८३ वी जयंती जिंतूर शहरासह तालुक्यात ठिक ठिकाणी साजरी

 बंजारा समाजाचे धर्मगुरू संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची २८३ वी जयंती जिंतूर शहरासह तालुक्यात ठिक ठिकाणी साजरी 

(महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी) जिंतूर : बंजारा समाजाचे धर्मगुरू संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची २८३ वी जयंती जिंतूर शहरासह तालुक्यात ठिक ठिकाणी साजरी 

जिंतूर शहरात अर्बन कॉलनी येथे दिनांक १४ फेब्रुवारीला बंजारा संगीत भजनाचा कार्यक्रम सौ.उज्वला ताई चव्हाण (रा.बेलोर) यांचा व वसंत महाराज ब्रम्हणगाव, विजयसिंग  महाराज सोनपेठ, उत्तम महाराज जांब तांडा, नाथराव महाराज चितनेर वाडी, उत्तम महाराज आडगाव, श्रीराम महाराज कुडा, संतोष महाराज कोलदडी अन्य बंजारा भजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच (दि.१५)  अर्बन कॉलनी येथून स्व. वसंतराव नाईक पुतळा या ठिकाणी पारंपारिक वेशभूषा मध्ये नवयुवक यांनी जल्लोषात लेंगी  घेऊन शांततेत आनंद व्यक्त करण्यात आला. 

अर्बन कॉलनी येथे संत सेवालाल महाराज यांच्या मंदिराची नियोजित जागा येथे भव्य दिव्य मंडप टाकून महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमास जिंतूर शहरातील बंजारा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिंतूर सेलू मतदार संघाच्या आमदार मेघना बोर्डीकर साकोरे त्यांनी संत सेवालाल महाराज जयंती निमित्त  शुभेच्छा दिल्या व तसेच माजी नगराध्यक्ष प्रतापराव देशमुख यांनीही शुभेच्छा दिल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत