Breaking News

ABOUT US

Hello Friends

Welcome to maha ghadamodi news! My name is Mr.Naseeb Anwar Zade ! I'm a Author with a passion for Making and composing.

I started maha ghadamodi news with the idea of helping research analysts like yourself, by offering news & media compny.

If you are like me then you like news & media compny too

Don't worry I've got you covered!

I am committed to

  • helping you with your business
  • focusing on finding you the best news & media compny
  • provide you a hassle-free service

Instead of thinking of all the things that can go wrong, become one of the people who look on how they go right. Your mind is powerful, and when you fill it with positivity your life naturally becomes

Please contact me if you need any help with the site at all!

I look forward to working with you!

Naseeb Anwar Zade


महा घडामोडी न्यूज हे एक ऑनलाइन वेब पोर्टल/युट्युब चॅनल असून, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे.हा स्तंभ अधिकाधिक बळकट करण्यासाठी महा घडामोडी न्यूज नेटवर्क ने देखील खारीचा वाटा उचलण्याचा निर्धार केला आहे.

माध्यमे समाज मनाचा आरसा असतात. लोकशाहीच्या सशक्तीकरणाच्या दृष्टीने माध्यमांची भूमिका मोलाची ठरते. समाजातील चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी, घटना, माहिती तथा बातम्या समोर आणण्यासाठी अशाच एका बेधडक माध्यमाची आवश्यकता लक्षात घेत आम्ही महा घडामोडी न्यूज ऑनलाइन वेब पोर्टल/यूट्यूब चॅनल सुरु केले. बातमीबरोबरच ज्ञानवृध्दी व्हावी हा यामागील आमचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे नुसती बातमी न देता, त्या बातमीच्या मुळाशी जाऊन व पाठपुरावा करुन विषयाला न्याय देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.

 त्याचबरोबर लोकांना विविध विषयांची माहिती व्हावी, त्यांच्या ज्ञानात भर पडावी या दृष्टीने विविध विषयांवरील लेख आम्ही महा घडामोडी न्यूजच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचवत होतो आणि यापूढे देखील पोहचवणार आहोत. नव्या युगाचा नवा पत्रकार घडवावा जेणेकरुन इतिहासातील आदर्शवत पत्रकारिता समाजाला पुन्हा जाणवेल हाच मुख्य उद्देश समोर ठेवुन महा घडामोडी न्यूज नेटवर्क कार्य करणार आहे. आमचे हे माध्यम संपूर्णत: सामान्य जनतेला समर्पित असेल.

महा घडामोडी न्यूज नेटवर्क केवळ बातमी नाही तर दणकाही देतो, आणि तोही पुराव्यांसह… रोजच्या त्याच त्याच बातम्यांपेक्षा ज्ञानात भर आणि डोळ्यात अंजन घालणाऱ्या बातम्या देण्यास आमचे प्राधान्य असेल.आमची बातमी शासकीय अधिकारी यांचे डोक ठिकाणावर आणेल, जनतेच्या समस्यांना वाचाही फोडेल.विविध लेख,माहिती वाचकांच्या ज्ञानात भर घालण्याचे काम करेल.'सरकारी काम चार महिने थांब’ या म्हणीचा प्रत्यय सामान्य नागरीकांना शासकीय कार्यालयांमध्ये येत असतो. पण महा घडामोडी न्यूज नेटवर्क यावर आपल्या चॅनलच्या माध्यमातून शासनाच्या गैरप्रकारांना जनतेसमोर आणेल.

आदिवासींच्या समस्या, विद्यार्थ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या अडचणी, भ्रष्टाचार असो किंवा सामान्य जनतेची हाक, समाजातील एखादी सकारात्मक बाब,महा घडामोडी न्युज प्रत्येक गोष्टीला न्याय देण्याचा प्रयत्न करेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत