Breaking News

प्रा. करवाडे यांना आचार्य पदवी प्रदान, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी केले अभिनंदन

प्रा. करवाडे यांना आचार्य पदवी प्रदान,  प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी केले अभिनंदन 


भंडारा जिल्हा प्रतिनिधी नरेंद्र मेश्राम ;-  स्व.निर्धनराव पाटील वाघाये कला व विज्ञान महाविद्यालय सौन्दड येथील इतिहास विभाग प्रमुख व मूळचे खुटसवरी, ता. लाखनी येथील रहिवासी प्रा. योगेश मारोती करवाडे यांनी ' मोगलांची लष्करी व्यवस्था : एक चिकित्सक अध्ययन (विशेष संदर्भात मनसबदारी पध्दती) (कालखंड इ.स. 1526 ते 1707) ' या विषयावर संशोधन करून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर अंतर्गत आचार्य पदवी प्राप्त केल्यामुळे महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. सदर शोधप्रबंध पूर्ण करण्यासाठी त्यांना प्रा.डॉ.मुबारक कुरेशी यांचे मार्गदर्शन लाभले. त्याचबरोबर प्रा. शरद डवरे, प्राचार्य के. सी. शहारे आणि मुकेश करवाडे यांनी त्यांचे या घवघवीत यशासाठी अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत