Breaking News

कॉलेजची पिकनिक त्यांच्यासाठी ठरली अखेरची,

कॉलेजची पिकनिक त्यांच्यासाठी ठरली अखेरची, 

केळवे समुद्रात बुडून तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

जीवाची पर्वा न करता बुडणाऱ्या मुलांना वाचवण्यासाठी त्यांनी समुद्रात उड्या मारल्या, पण... 



महा घडामोडी न्यूज नेटवर्क,पालघर : नाशिकमधल्या ब्रम्हावेली कॉलेजचे 39 विद्यार्थी सहलीसाठी पालघर जिल्ह्यातल्या केवळे बीच इथं आले होते. यातील तीन विद्यार्थ्यांचा आणि एका स्थानिक मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू झाला. ब्रम्हावेली कॉलेजचे 39 विद्यार्थी केळने बीचवर सहलीनिमित्ताने केळवे बीचवर मौजमजा करत होते. त्याचेवळी समुद्रात दोन लहान मुलं बुडत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. समुद्राला ओहोटी असल्याने बाहेर येण्यासाठी मुलांची धडपड सुरु होती. सहलीसाठी आलेल्या मुलांच्या हे लक्षात येताच यातल्या चार मुलांनी थेट समुद्रात उड्या मारल्या.

यातल्या एका मुलाला वाचवण्यात त्यांना यश आलं, पण दुसऱ्या मुलाला वाचवताना हे तीनही विद्यार्थी समुद्रात बुडाले. ओहोटी असल्यामुळे हे सर्वजण समुद्रात खोलवर ओढले गेले. यात चारही जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. ओम विसपुते, कृष्णा शेलार आणि दीपक वडकाते असं या मृत विद्यार्थ्यांची नावं असून हे सर्व नाशिकमध्ये राहणार आहेत. तर मुकेश नाकरे असं स्थानिक मुलाचं नाव आहे. स्थानिक मच्छिमारांच्या मदतीने चारही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत