Breaking News

डुकराच्या हल्ल्यात दोघे जखमी, निलज शेतशिवारातील घटना

 डुकराच्या हल्ल्यात दोघे जखमी, निलज शेतशिवारातील घटना

महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी,ब्रम्हपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील निलज शिवारामध्ये डुकराने दोघांवर हल्ला करून जखमी केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास घडली यातील एक जण गंभीर जखमी असून दोघांनाही उपचार अर्थ ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे हलविण्यात आले दिवाकर ढोरे शामराव ढोरे असे डुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तींची नावे आहेत.

 सकाळच्या सुमारास दिवाकर ढोरे हे आपल्या शेतात काम करण्यासाठी गेले असता शेतातून बाहेर पडत असताना अचानक डुकराने हल्ला केला यात ते गंभीर जखमी झाले आहे तर शामराव ढोरे हे रोवणीचे काम सुरू असल्याने शेतावर उभे होते दरम्यान मागून डुकराने त्यांच्यावर हल्ला केला घटनेची माहिती गावात पसरतात अशोक भुते सचिन ढोरे यांनी दोघांनाही उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी येथे दाखल केले घटनेची माहिती मिळताच मेंडकी वनपरिक्षेत्राचे क्षेत्र सहाय्यक शेंदुरकर यांनी जखमींची ग्रामीण रुग्णालय येथे भेट घेतली परिसरात सध्या रोवणी व शेतीचे कामे जमा सुरू असून डुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत