Breaking News

राजकीय,सामाजिक कारकिर्दीतील नवपर्वाची रणरागिणी - सौ. एकता प्रशांत समर्थ

राजकीय,सामाजिक कारकिर्दीतील नवपर्वाची रणरागिणी- सौ. एकता प्रशांत समर्थ

महाघडामोडी न्युज नेटवर्क, लोकेश पारखी 
:- भारतीय राष्ट्रीय कांग्रेस प्रणित नगराध्यक्ष पदाची सुजाण उमेदवार...!
जनसेवेचा ध्यास घेऊन राजकारणात पहिल्यांदा पाऊल टाकणारी एक सर्व सामान्य सुशिक्षित, सुसंस्कृत गृहिणी मनांनी स्वच्छ सुंदर आणि निर्मळ व्यक्तीमत्व. मूल नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत आपल्या कार्यकुशलता सिद्ध करण्यास आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सज्ज असलेली उमेदवार.आपले यजमान न.प.माजी बांधकाम सभापती श्री. प्रशांत समर्थ ह्यांच्या खांद्याला खांदा लावून सामाजिक कार्यात
अग्रेसर, महिलांच्या हित रक्षणात सदैव तत्पर असलेली स्त्री शक्ती चे जिवंत प्रतीक. वागणुकीत सौम्यता जोपासणारी आणि सौजन्यशीलता हा गुणधर्म असणारी नवपर्वाची रणरागिणी.
समाजातील दूर्बल, वंचित घटकांप्रती सहानभूती व न्याय मिळावा ह्यासाठी सतत प्रयत्नशील असणारी उमेदवार म्हणून आपल्या सर्वांचे आशीर्वादानी नव्या उत्साहाने नव्या युगाचा प्रारंभ करण्यात सज्ज झाली आहे. आपल्या सर्वांच्या साथीने ही नौका सातासमुद्रापार जाईलचं.हयात तिळमात्र शंका नाही. हा विश्वास घेऊन आपल्यासमोर मूल नगरपरिषद निवडणूक रणांगणात नगराध्यक्ष पदाची जबाबदारी उचलण्यास तयार झाली आहे. मूल शहर एक विकसित शहर म्हणून नावा रूपात यावे ह्या सद्भभावनेने मूल शहरातील गल्लीबोळातील विविध समस्यांची जाण ठेवून श्री. प्रशांत समर्थ ह्यांनी जी जनतेची नाळ ओळखली आणि मूल नगरात आपली उत्तम प्रतिमा निर्माण केली ह्याच प्रतिमेचा मान राखून ताई च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. सौ.एकता समर्थ ही एक सामान्य महिला आहे. ना कोणती शासकीय नोकरी करणारी स्त्री ना कोणत्या धनाची लालसा बाळगणारी आहे. चोवीस तास आपल्या सर्वांच्या सेवेत स्वतःला झोकून देण्याची जिद्द आणि समर्पण करण्यासाठी..!! आपण हाक द्या आम्ही साथ देऊ ही मनिषा बाळगून. एकता ताईला मूल नगरातील गल्ली कोपऱ्यातून पसंती मिळत आहे हयात काही वावगे नाही.अविरत सेवेचा ध्यास घेऊन मूल नगराला प्रगतीच्या शिखरावर नेण्यासाठी त्यांच्यासोबत आपली साथ सदैव राहू द्या .. आणि ताईचे हात बळकट करूया. आणि एक सुजाण, जाणकार स्त्रीला तनमनांनी आणि प्रचंड मताधिक्यांनी निवडून देऊ या.
अस्तित्वाच्या लढाईत सामील होऊ या
आपल्या सर्वाचा आशीर्वाद पाठीवर ठेवूया
चला तर मग लागा तयारीला
कारण अभी नहीं तो कभी नही!

1 टिप्पणी: