Breaking News

अनुष्का पाटोळे हिच्या मृत्यूची SIT मार्फत चौकशी करून संशयित आरोपींना अटक करा

जिवती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर, जिवती:- लातूर येथील जवाहर नवोदय विध्यालयातील इयत्ता ६ वीत शिकत असलेल्या मातंग समाजातील विध्यार्थिनी कु.स्व. अनुष्का पाटोळे हिच्या मृत्यूची SIT मार्फत सखोल चौकशी करून आरोपीवर सदोषमनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपीला कठोरात कठोर शाषण करणे व संपूर्ण महाराष्ट्रतील सकल मातंग समाजावर सतत अन्याय अत्याचार होत आहेत. तसेच सामाजिक व राजकीय स्तरावर तसेच शैक्षणिक संस्थेमध्ये देखील अन्याय अत्याचार होत आहेत. यामध्ये लातूर येथील नवोदय विध्यालयातील इयत्ता 6 वी मध्ये शिकत असलेल्या मातंग समाजातील विध्यार्थिनी कु.स्व. अनुष्का पाटोळे हिचा संशयास्पद मृत्यू झाला असून. तिच्या मृत्यूची SIT मार्फत सखोल चौकशी करून संशयित आरोपीला अटक करून त्यांच्यावर सदोषमनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी व पीडितांच्या कुटुंबीयास २५,००,००० {पंचवीस लक्ष रुपये }ची मदत करावी व अश्या घटना होऊ नये या साठी शासनाने तत्काळ पाऊले उचलून त्यावर उपयोजना करावी.अशी मागणी

निवेदनातून करण्यात आली. निवेदन जिवतीचे तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. निवेदन देताना जिवती तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष विजय लक्ष्मणराव गोतावळे, जिवती तालुका अल्पसंख्यक अध्यक्ष आरिफ भाई शेख, सय्यद शब्बीर जागीरदार, उद्धव गोतावळे, बालाजी पुल्लेवाड, गोविंद मिटपल्ले, सामाजिक कार्याकर्ते बालाजी मोरे सर, आनंद पवार, नामदेव तोगरे, गणेश जाधव, संजय राठोड, संजय भालेराव गजानन चव्हाण धनाजी कांबलेक8सं गोतावळे सटवा भालेराव इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत