जिंतूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती इलेक्ट्रॉनिक मीडिया संघा जिंतूरच्या वतीने साजरी करण्यात आली
जिंतूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती इलेक्ट्रॉनिक मीडिया संघा जिंतूरच्या वतीने साजरी करण्यात आली
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधि माबूद खान,जिंतूर : छत्रपती शिवाजी महाराज जयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसा निमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स.१८६९ साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. फुलेंनी इ.स १८७० साली शिवजयंती सुरु केली, जी पहिली शिवजयंती होती,
महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आदराने घेतले जाते. अनेक विद्वान, तत्त्वज्ञ,, इतिहासकार शिवाजी महाराजावर अभ्यास करण्यासाठी भारतात येतात १९ फेब्रुवारी रोजी विविध देशांमध्ये शिवाजी महाराजांची जयंती जल्लोषात साजरी केली. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक जिंतूर येथे अभिवादन करताना इलेक्ट्रॉनिक मीडिया संघाचे जिल्हध्यक्ष प्रदीप कोकडवार, तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण,उप अध्यक्ष शे रहीम, फेरोज पठाण,अजमत पठाण, बी डी रामपूरकर, महेश देशमुख, बाबा खान, साधना न्यूज प्रतिनिधी सचिन रायपत्रीवार महाराजाना वंदन केले


कोणत्याही टिप्पण्या नाहीत