Breaking News

दे धक्का ! बारावी परीक्षेच्या टाइम टेबलमध्ये बदल; 'हे' 2 पेपर्स ढकलले पुढे

दे धक्का !  बारावी परीक्षेच्या टाइम टेबलमध्ये बदल; 'हे' 2 पेपर्स ढकलले पुढे 

मुंबई : कोरोनामुळे गेल्या सुमारे दोन वर्षांमध्ये दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांचा खेळखंडोबा झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यात यावर्षीही अनेक महिने शिक्षण ऑनलाईन पद्धतीनं देण्यात येत आहे. त्यामुळेच एका बाजूनं ऑफलाईन परीक्षांना विद्यार्थी विरोध करत आहेत. तर राज्य सरकारनंही बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईनच होणार याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. मात्र 23 फेब्रुवारीला घडलेल्या एका घटनेमुळे बारावीच्या टाइम टेबलमध्ये बदल करण्यात आला आहे.

23 फेब्रुवारीला प्रश्न पत्रिका घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोला पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यात जवळ आग लागली होती. त्यामुळे सर्व प्रस्ग्नपत्रिका जाळून खाक झाल्या होत्या. या टेम्पोमध्ये बारावीच्या प्रश्नपत्रिका होत्या. म्हणूनच आता बारावीच्या टाइम टेबलमध्ये बदल करत काही पेपर्स पुढे ढकलण्यात आले आहेत.

बारावी परीक्षेचे 5 आणि 7 मार्च रोजी होणारे पेपर्स हे आता 5 आणि 7 एप्रिल रोजी होणार आहेत. म्हणजेच सुरुवातीचे दोन पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. 5 मार्च रोजी होणारा हिंदी चा पेपर आता 5 एप्रिलला होणार आहे. तर 7 मार्चला होणारा मराठीचा पेपर हा 7 एप्रिलला घेणार येणार आहे. परीक्षा तोंडावर आली असताना हे बदल करण्यात आल्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होणार आहे. मात्र प्रश्नपत्रिका नसल्यामुळे हे बदल करण्यात आले आहेत.

हे बदल लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा आणि परीक्षेला उपस्थित राहावं असं आवाहन शालेय शिक्षण मंडळाकडून करण्यात आलं आहे. तसंच हे बदल केवळ तारखेत असणार आहेत परीक्षेचा अभ्यासक्रम हा सारखाच असणार आहे हेही स्पष्ट करण्यात आलं आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत