Breaking News

नक्षलवादी- CRPF मध्ये चकमक, सहायक कमांडंट शहीद

नक्षलवादी- CRPF मध्ये चकमक, सहायक कमांडंट शहीद

(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) छत्तीसगड : एक मोठी बातमी समोर येत आहे. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात  CRPF आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीत CRPF जवान शहीद झाल्याचं वृत्त समोर येत आहे. CRPF अधिकाऱ्यानं यासंदर्भातली माहिती दिली आहे.

पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. उसूर ब्लॉकच्या पुटकेल जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाल्याचं समजतंय.

दरम्यान सीआरपीएफ 168 बटालियन आणि नक्षलवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरू असल्याचं वृत्त समोर आलं आहे. या चकमकीत सहायक कमांडंट एस बी तिर्की हेही शहीद झाले आहेत. तर एक जवान जखमी झाला आहे. विजापूरचे एसपी कमलोचन कश्यप यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत