Breaking News

पोलीस उपविभागीय अधिकारी यांची घेतली महाराष्ट्र पत्रकार संघाच्या ईलेक्ट्रॉनिक मिडीया पदाधिकार्‍यांनी भेट घेऊन दिली शुभेच्छा

 पोलीस उपविभागीय अधिकारी यांची घेतली महाराष्ट्र पत्रकार संघाच्या ईलेक्ट्रॉनिक मिडीया पदाधिकार्‍यांनी भेट घेऊन दिली शुभेच्छा

(महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी) जिंतूर :  जिंतूर पोलीस उपविभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी पांडुरंग गोफने यांची आज महाराष्ट्र पत्रकार संघ जिंतूर तालुका इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्या पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेऊन तालुका अंतर्गत असलेल्या जिंतूर बोरी बामणी चारठाणा या चार पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेल्या घटना गुन्हे आदी प्रकरणाची माहिती प्रसिद्धी इलेक्ट्रॉनिक मिडियाच्या प्रतिनिधींना गतीने मिळावी अशी विनंती यावेळी करण्यात आली प्रथम पोलीस उपविभागीय अधिकारी नुकतेच या उपविभागात  नव्याने रुजू झालेले असल्यामुळे त्यांचा प्रथम पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला यावेळी त्यांनी उपविभाग अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस स्टेशन ची माहिती आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल असे स्पष्ट केले यावेळी परभणी जिल्हा अध्यक्ष प्रदीप कोकडवार जिंतूर तालुका अध्यक्ष भागवत चव्हाण सचिव अजमत पठाण उपाध्यक्ष रहीम भाई संघटक फिरोज भाई सहसचिव महेश देशमुख सहसंघटक कयूम खान सदस्य बिडी रामपूरकर सचिन रायपत्रीवार  माबूद खान इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत