आई रागावली म्हणून घेतले विष, पंधरा वर्षीय विद्यार्थिनीने संपविले जीवन
आई रागावली म्हणून घेतले विष, पंधरा वर्षीय विद्यार्थिनीने संपविले जीवन
नागपूर : अल्तिया ही मोमीनपुऱ्यात राहणारी पंधरा वर्षांची विद्यार्थिनी. दहाव्या वर्गात शिकत होती. चौदा फेब्रुवारीला अल्तिया शाळेतून घरी आली. अभ्यास करत नव्हती म्हणून तिची आई तिला रागावली. दोघांचाही वाद झाला. हे बोलणं तीनं मनावर घेतलं. आईचं नेहमीचं बोलणं ऐकूण तिला त्रस्त झाल्यासारखं वाटू लागलं. त्यामुळं तीनं सायंकाळी विष घेतले. त्यामुळं तिची प्रकृती खालावली. कुटुंबीयांनी तिला उपचारासाठी दाखल केले. पण, उपचारादरम्यान गुरुवारी अल्तियाचा मृत्यू झाला. तहसील पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली. ही मुलगी वयात आली होती. किशोरावस्थेमुळं मुलांच्या शरीरात बरेच बदल होत असतात. त्यामुळं अशावेळी मुलांशी वागताना खूप सांभाळून बोलावे लागते. त्यांना मित्राप्रमाणे वागवावे लागते. अन्यथा ही मुलं घातक पाऊल उचलू शकतात.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत