धान उत्पादक शेतकऱ्यांची भाजीपाला पिकाकडे वाटचाल
धान उत्पादक शेतकऱ्यांची भाजीपाला पिकाकडे वाटचाल
महा घडामोडी न्यूज प्रतीनिधी संतोष रोकडे, अर्जुनी मोरगाव तालुक्यात शेती हेच मुख्य रोजगाराचे साधन आहे.या भागातील शेतकरी धान उत्पादक शेतकरी म्हणून विदर्भात परिचित आहेत.धान पिकासाठी लागणारे भौगोलिक हवामान आणि परिस्थिती अनेक अनुकूल असल्याने शेतकऱ्यांचे प्रमुख पीक आहे.खरीप आणि उन्हाळी हंगामात धान पिकाची शेती केली जाते.मात्र धानाला मुबलक हमीभाव लागवड खर्च जास्त आणि उत्पादन कमी या परिस्थितीमुळे धान उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
या विपरीत परिस्थितीवर मात करीत आता तालुक्यातील शेतकरी आधुनिक पद्धतीने शेती करीत धान पिकाला फाटा देत भाजीपाला आणि फळबागाकडे वाटचाल करीत आहेत.
तालुक्यातील मोरगावचे धान उत्पादक शेतकरी शिवराम लोधी यांचेकडे चार एकर शेती आहे.एक एकर शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत मल्चिंग व ड्रीपने भेंडी आणि मिरची पिकाची लागवड केली आहे.सोबत जोड व्यवसाय म्हणून शेतामध्येच पोल्ट्री फॉर्म उभारले आहे.हे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर फळबागायती कडे वाटचाल करण्याचा त्यांचा संकल्प आहे. मिरची आणि भेंडी या भाजीपाला पिकातून हंगामात त्यांना 90 हजार रुपये खर्च वजा जाता दोन लक्ष रुपये नफा अपेक्षित आहे.पुढील 3 वर्षे त्यांना मल्चिंग आणि ड्रिप ला खर्च लागणार नाही.अशा परिस्थितीत त्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन या तंत्राचा फायदा होणार आहे.लोधींच्या या प्रयोगासाठी तालुका कृषी विभागाच्यावतीने कृषी पर्यवेक्षक मुनेश्वर कठाणे व कृषी सहाय्यक यशवंत कुंभरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे. शेतकऱ्यांनी धान पिकाची परंपरा मोडीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुखी संपन्न होण्याचे आवाहन शेतकरी शिवराम लोधी यांनी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत