शिकारीसाठी गेले आणि आले वनविभागाच्या जाळ्यात , भंडाऱ्यात चौदा जणांवर कारवाई
शिकारीसाठी गेले आणि आले वनविभागाच्या जाळ्यात , भंडाऱ्यात चौदा जणांवर कारवाई
(महा घडामोडी न्यूज नेटवर्क) भंडारा : लाखांदूर वन परिक्षेत्रातील घनदाट अरण्य आहे. या जंगलात विविध प्रजातींचे जंगली पक्षी आहेत. वनक्षेत्राजवळील गावातील काही शिकारी टोळ्या सक्रिय झाल्यात. या भागात दुर्मिळ पक्ष्यांची शिकार केली जाते. अशाच प्रकारची घटना उघडकीस आले. रात्री वन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटना स्थळावर सापळा रचला होता. रात्री साडेनऊच्या सुमारास शिकाऱ्यांच्या दुचाकी रोहनी – पाऊनगाव रस्त्यावर ठेवलेल्या दिसल्या. मोटारसायकलींजवळ शिकारी शिकार करून आल्यानंतर वन विभागाच्या पथकाने त्यांच्यावर धाड टाकली. या धाडीत त्यांच्याजवळ 1972 मधील अनुसूची चारमधील कॉलर डॉव (कवळ्या) 42 जीवंत तीन मृत, ब्राम्हणी स्टॅलिंग (मोठी मैना) दोन व लहान मैना एक मृत जप्त करण्यात आली. तसेच शिकारीसाठी वापरण्यात आलेले नायलॉन जाळे तीन बास हस्तगत करण्यात आले. याशिवाय सहा दुचाकी व पाच मोबाईल जप्त करून चौदा शिकाऱ्यांना अटक करण्यात वन विभागास यश आले.
यांनी केली आरोपींविरोधात कारवाई
आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 अंतर्गत वन्यजीव अपराधाची नोंद करण्यात आली. उपवन संरक्षक एस. बी. भलावी, साकोलीचे सहाय्यक वनसंरक्षक आरती राठोड यांचे मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश गावित तपास करीत आहेत. क्षेत्र सहाय्यक आय. जी. निर्वाण , जी. डी. हात्ते, एम. ए. भजे , पी. बी. ढोले, एस. जी. खंडागळे, बी. एस. पाटील, आर. ए. मेश्राम, प्रफुल्ल राऊत, पोलीस पाटील नंदकिशोर मेश्राम तसेच वन मजूर विकास भुते यांनी कारवाई केली.
पक्ष्यांची केली होती शिकार
लाखांदूर वनपरिक्षेत्रातील तिरखुरीजवळ रोहनी शेत शिवार आहे. या भागात दुर्मिळ जंगली पक्ष्यांची शिकार करणारे सक्रिय झाल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यांनी शिकाऱ्यांकडून कॉलर डॉव (कवड्या) 45, ब्राम्हणी स्टॅलिंग (मोठी मैना) तीन तसेच शिकारीसाठी वापरलेले साहित्य जप्त केले. यामध्ये सहा मोटारसायकल आणि पाच मोबाईल हँडसेटचा समावेश आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत