जेसीआय तर्फे चंद्रपूर मनपाचे उपमहापौर राहूल पावडे देशपातळीवर सन्मानित.
जेसीआय तर्फे चंद्रपूर मनपाचे उपमहापौर राहूल पावडे देशपातळीवर सन्मानित.
आ. मुनगंटीवार यांनीही केला सत्कार.
याप्रसंगी बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले, भाजपा हा ८० टक्के समाजसेवा व २० टक्के राजकारण या धोरणावर चालणारा राष्ट्रीय पक्ष आहे. याच धर्तीवर राहूल पावडे सुध्दा अनेक लोकोपयोगी कामे करून दलित, शोषीत, वंचित, समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न नेहमीच करतो हे कौतुकास्पद आहे. त्याच्या हातुन अशीच कामे पुढील आयुष्यातही होत राहो या शुभेच्छा आ. मुनगंटीवार यांनी यावेळी दिली.
सत्काराला उत्तर देताना राहूल पावडे यांनी नम्रपणे हा पुरस्कार स्विकारत असल्याचे सांगीतले तसेच आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच मी आधीही काम करीत आलो आहे व पुढेही काम करीत राहील. कुठलाही पुरस्कार हा एकटयाच्या कामामुळे मिळत नसतो. संघटना आपल्या मागे उभी असावी लागते. अशी संघटना भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातुन माझ्या मागे उभी आहे हे मी माझे भाग्य समजतो. यापुढेही मी सामाजिक कामे सुरूच ठेवीन, अशी ग्वाही राहूल पावडे यांनी दिले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत