Breaking News

सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी भोजराज लोगडे यांची निवड

सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी भोजराज लोगडे यांची निवड



महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, संतोष रोकडे अर्जुनी मोर. :- अर्जुनी मोर तालुका सरपंच /उपसरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी प्रतापगड ग्रामपंचायती चे सरपंच भोजराज लोगडे यांची एकमताने निवड करण्यात आली. अर्जुनी मोर. तालुका सरपंच व उपसरपंच संघटनेची सभा दि.४ मार्च रोजी पंचायत समिती च्या बचतभवन येथे सरपंच व उपसरपंच संघटनेचे माजी अध्यक्ष तथा सिरेगांवबांध चे माजी सरपंच हेमकृष्ण ( दादा पाटील ) संग्रामे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सभेला तालुक्यातील ७० ग्रामपंचायती चे सरपंच उपसरपंच उपस्थित होते. गावविकासासह सरपंच व उपसरपंच संघटनेच्या विवीध विषयावर चर्चा झाली. यावेळी सरपंच व उपसरपंच संघटनेच्या अध्यक्ष पदासह अन्य पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
  यामधे सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदी प्रतापगड ग्रामपंचायती चे सरपंच भोजराज लोगडे यांची एकमताने निवड करण्यात आली. तर सरचिटणीस पदी महालगाव गटग्रामपंचात चे सरपंच अशोक कापगते यांना कायम ठेवण्यात आले. उपाध्यक्ष पदी संजय खरवडे, प्रकाश शिवनकर, प्रभाकर कोवे, युवराज तरोणे, महिला उपाध्यक्ष पदी निशिगंधा खोब्रागडे, कुंदाताई डोंगरवार, सहसरचिटनिसपदी डाॅ. अजय अंबादे, कोषाध्यक्ष किशोर कापगते, प्रसिद्धी प्रमुख लक्ष्मीकांत नाकाडे, पराग कापगते, प्रमुख मार्गदर्शक नंदु गहाणे, रघुनाथ लांजेवार,तर कार्यकारिणी सदस्य म्हणुन काशिनाथ कापसे, भगवान नाकाडे, अनिल पालीवाल,विश्वनाथ बाळबुध्दे, निजाम रामटेके ,लिलेश्वर खुणे ,
दिपक सोनवाने,विलास फुंडे, पपिता नंदेश्वर, प्रतिभा बोरकर, सोनिया वाढई,सुजाता गुढेवार,आदिंची निवड करण्यात आली. यावेळी माजी अध्यक्ष हेमकृष्ण संग्रामे यांनी अध्यक्ष पदाची सूत्रे नवनिर्वाचित अध्यक्ष भोजराज लोगडे यांचे कडे सोपविली.यावेळी संघटनेचे अध्यक्ष भोजराज लोगडे यांनी संघटनेच्या कामात सदैव तत्पर राहुन तालुक्यातील प्रत्येक गावाच्या विकासासाठी काही अडीअडचणी आल्या तर संघटनेच्या माध्यमातून सोडविण्याचा नक्कीच प्रयत्न करु असे आश्वासन दिले.

30% OFF OFFER

Happilo 100% Natural Premium Californian Almonds Value Pack Pouch,Dried,500g

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत