Breaking News

गाव खेड्यात दारूविक्रेते जोमात, पोलीस प्रशासन हप्ते घेऊन कोमात

 जिवती तालुक्यात अवैध दारूचा महापूर

महा घडामोडी न्यूज जिल्हा प्रतिनिधी, शेख हक्कानी, चंद्रपूर, जिवती : तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या अवैध दारू विक्रेत्यांनी सीमा ओलांडली असून. जिवती पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या अनेक गावांमध्ये अवैध दारूचा महापूर आला आहे. गल्ली बोळात मिळणाऱ्या या अवैध दारूमुळे ग्रामीण भागातील शांतता आणि आरोग्य धोक्यात आले असून या गंभीर प्रकाराकडे पोलीस प्रशासन हप्ते घेऊन जाणीवपूर्वक  दुर्लक्ष करत असल्याचं आरोप सुज्ञ नागरिकाकडून केला जात आहे. सध्या लग्नाचं सीजन सुरू असून लग्नात येणाऱ्या वराडीला सहज दारू मिळत असल्यामुळे लग्नातील काही वराडी पंग पंग पंगाट होऊन झिंग झिंग झिंगाट गाण्यावर ठुमका  धरत असून यात एखाद्याला धक्का लागला किंवा गाणं बदले म्हणून भांडण, तंट्यात रूपांतरित होत असल्याचे बोलले जात आहे. 

माहितीनुसार जिवती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गावात अवैध दारू विक्रेते निडर होऊन गावांमधील मुख्य चौकात, मुख्य रस्त्यावर, गल्लीबोळात परवानाधारक असल्यावाणी अवैध दारूची विक्री राजरोसपणे करत असुन. काही ठिकाणी दारू शौकीनला होम डिलिव्हरी सुद्धा मिळत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दारू विक्रेते खुलेआम जिवती या शहरातून टू व्हीलर वर पेट्याने  दारू घेऊन येत असल्याचे बोलले जात आहे. आणि डुबलीकेट दारूची खेप गडचांदुर मार्गाने जिवती तालुक्यात येत असल्याची चर्चा जोमा सुरू आहे. या डुबलीकेट दारूमुळे अनेक जण मरणाच्या दारात आहेत. 

युवा पिढी आणि कष्टकरी वर्ग संकटात सापडला आहे.

अवैध दारूच्या सर्वाधिक फटका शेतमजूर आणि तरुण पिढीला बसत आहे. दिवसभराची मजुरी दारूच्या अड्ड्यावर खर्च होत असल्याने अनेक गरीब कुटुंबाचे संसार उघड्यावर आले आहेत. गावागावांत वाढलेल्या दारूच्या व्यसनामुळे भांडण-तंटे घरगुती हिंसाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ग्रामीण भागातील महिलांमध्ये या परिस्थितीमुळे प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

पोलिसांच्या निष्काळजी पणावर प्रश्नचिन्ह?

पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असताना पोलीस कारवाई का करत नाहीत? असा सवाल उपस्थित केला जात आहे. अधून मधून होणाऱ्या किरकोळ कारवाया केवळ 'दिखावा' ठरत असून. मुख्य तस्करांना पोलिसांचे 'अभय' आहे का? अशी चर्चा आता जनसामान्यात रंगू लागली आहे. 

कारवाईचा आदेश द्या

जर जिवती पोलिसांनी त्वरित या अवैध दारू अड्ड्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त केला नाही, तर गावागावातील महिला आणि सामाजिक कार्यकर्ते पोलीस ठाण्यावर धडकू शकतात? अशी चर्चा सध्या घडीला सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणी स्वतः लक्ष घालून जिवती पोलिसांना कडक कारवाईचे आदेश द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत