Breaking News

मंत्र्याच्या गाडीवर हल्ला ; भाजपाकडे बोट

मंत्र्याच्या गाडीवर हल्ला ; भाजपाकडे बोट


महा घडामोडी न्युज नेटवर्क, दिल्ली : सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून एप्रिलमध्ये या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. दरम्यान दिल्लीत सर्वच पक्षांनी आपला प्रचार सुरू केला आहे. त्यातच आम आदमी पार्टीचे दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याच्या दावा आपने केला आहे.

याबाबाबत अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करता म्हंटले आहे की, "हे भाजपा आहे. माफिया आणि गुंडांची पार्टी. जेव्हा हे हारत असतात तेव्हा हे आपली औकात दाखवतात. यांना जनता त्यांची औकात दाखवेल." अशा खोचक शब्दांत त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत