पत्रकार अरविंद पत्की यांनी उदगीर येथील पत्रकार आंदोलन कर्त्यांचे मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
पत्रकार अरविंद पत्की यांनी उदगीर येथील पत्रकार आंदोलन कर्त्यांचे मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन
महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी बालाजी सुवर्णकार, उदगीर : उदगीर येथील पत्रकाराच्यावतीने मागील 24 जून 2022 पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय पर्यंतचे रोड व नालीचे चालू असलेले बांधकाम बंद करा वे या मागणीसाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथे उदगीर जिल्हा मराठी पत्रकार परिषद व मराठी पत्रकार संघ उदगीर व पत्रकारांच्या संयुक्त विद्यमाने चालू असलेल्या धरणे आंदोलनास 22 दिवस पूर्ण होऊन देखील उदगीर नगर परिषदेचे मुख्याधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांनीही अतिक्रमण काढण्यासाठी कसल्याच प्रकारचा पत्रव्यवहार व धरणे आंदोलन कार्यकर्त्या पत्रकारांना त्यांनी समक्ष भेट व अधिक काढण्यासंदर्भात तागायत कसल्याही प्रकारचे अतिक्रमण न काढल्याने
दिनांक दिनांक 15 जुलै 2022 रोजी महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सामान्य प्रशासन विभाग मुंबई, अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना आज तागायत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी दिलेल्या निवेदनाच्या प्रति सोबत जोडून अतिक्रमण काढण्याची मागणी पत्रकारांच्या वतीने करण्यात आली आहे. या निवेदनावर सुनील हवा,नागनाथ गुट्टे,अंबादास अलमखाने, अरविंद पत्की, सिद्धार्थ सूर्यवंशी,संगम पटवारी,सुधाकर नाईक,बसवेश्वर डावळे,इरफान शेख,बिभीशन मध्येवाड, यांच्यासह इतरांच्या स्वाक्षऱ्या आहेत. नवनिर्वाचित महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या पत्राकारांच्या मागणीकडे लक्ष देतील का याकडे उदगीरच्या सर्व जनतेचे लक्ष लागून आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत