Breaking News

लाखांदूर तालुक्यातील शेतांत वन्य प्राण्यांचा हैदोस.

लाखांदूर तालुक्यातील शेतांत वन्य प्राण्यांचा हैदोस.                
    धान पिकांचे प्रचंड नुकसान नुकसान भरपाई ची शेतकऱ्यांची मागणी



महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : लाखांदूर  तालुका जंगलव्याप्त असून यातील बराचसा भाग हा जंगलाने वेढलेला आहे .जंगली प्राण्यांचा मुक्त संचार होत असून जंगली पाणी आपला मोर्चा गावाकडे वळवून मिळेल त्या ठिकाणी हैदोस दिसून येत आहे. असाच हायदोस लाखांदूर परिसरातील शेतामधील उभ्या पिकात रान गाईच्या कळपाने मांडून पिकाचे नुकसान केले, असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

कसेबसे या हंगामासाठी पैशाची जुळवाजुळव करून उभे केले व रोहिणी हंगाम आटोपला मात्र रोवणा  होऊन महिना लोटला असताना ,सुद्धा जंगली प्राण्यांच्या उपद्रवामुळे या हंगामात लागवड केलेली रक्कम हाती लागते की नाही हे सांगणेही अवघड, झाल्याचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले. वन विभागामार्फत कठोर कायदे राबवून वन्यजीव बचावासाठी मोहीम राबवताना मात्र शासनाला शेतकऱ्यांचा विरोध पडला तर नाही ना? असा सवालही शेतकरी विचारत आहे .वन विभागामार्फत तात्काळ उपाय योजना राबवून बचावासाठी मोहीम राबविण्याची गरज भासत असून जगला जवळील शेतजमिनीला वन विभाग मार्फत ताराचे कुंपण तयार करून देऊन नुकसानग्रस्त शेतकर्‍यां च्या या पिकाची तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

    वन्य प्राण्या पासून नही शेतकऱ्यांना पिकाला वाचवावे लागते. त्यात हल्ल्याचे प्रमाणही वाढत चालले आहे .दिवसा वीजपुरवठा खंडित होत असल्याने रात्री शेतात जाऊन पिकाला सिंचनाचे पाणी द्यावे लागते. रात्रीच्या  वेळी पिकाला पाणी देताना विषारी सरपटणाऱ्या प्राण्यांचा शेतकऱ्यांसाठी जीव घेना ठरतोय .पावसाळ्यात च नव्हे तर उन्हाळ्यातही दर्शन होत असल्याने  काही शेतकर्‍यात सिंचनाचा पाणी देण्याचा प्रश्न येईल प्रश्नही ऐरणीवर आलेला आहे.अशी मागणी सामाजिक कायर्यकर्ता सुनिल शेंडे यानी केली .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत