मग्रारोहयो च्या कामावरील महिलेला रानटी डुकराची धडक!
मग्रारोहयो च्या कामावरील महिलेला रानटी डुकराची धडक!
नितीन घोनमोडे मचारना यांच्या शेताशेजारील नाल्यावर गाळ काढण्याचे काम मग्रारोहयो योजनेतून सुरू आहे. नित्याप्रमाणे मजूर आपल्या काम करीत असताना गावठी कुत्र्यांनी रानटी डुकरा चा पाटलाग केला. तो बेभानपणे सैरावैरा पळत थेट मजूरात घुसला. यावेळी रत्नमाला मेश्राम यांच्या पायाच्या पोटरी वरिल भागात मोठी जखम झाली. तत्काळ प्रसंगावधान साधत ग्रामीण रुग्णालय पालांदूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.
पायाला जबर जखम, मचारना येथील घटना
ग्रामीण रुग्णालय पालांदूर येथे उपचार सुरू
महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : कुत्र्यांनी पाठलाग केल्याने रानटी डुक्कर बेभानपणे शेत शिवारात पळत सुटला. यात मग्रारोहयो योजनेत काम करणाऱ्या महिला मजूरला त्याने जबर धडक दिली. रत्नमाला धनराज मेश्राम (५५) असे जखमी महिलेचे नाव असून ग्रामीण रुग्णालय पालांदूर येथे उपचार सुरू आहेत. ही घटना ४ मार्चला सकाळी १० च्या सुमारास पालांदूर जवळील मचारना तालुका लाखणी येथे घडली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत