Breaking News

वयोवृद्ध अशिक्षित शेतक-यांचे बँक खात्यातुन रक्कम लंपास

मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पालांदुर येथील प्रकार

शाखा व्यवस्थापकाची संशयास्पद भुमिका


महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी नरेंद्र मेश्राम, भंडारा : वृध्दपकाळ व आजारपण तथा भविष्याचा विचार करून जवळपास सर्वच कुटुबांकडुन बचत केली जाते. बचतीची रक्कम सुरक्षित राहावी यासाठी बँकेचा आश्रय घेतला जातो पण बँक अधिका-याकडुन रक्कम काढणारा खातेदारच आहे का? याची शहानिशा केली जात नसल्यामुळे त्रयस्थाकडुन बँक खात्यातून रक्कम लंपास केली गेल्याचा अफलातून प्रकार दि भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल को आँपरेटिव्ह बँक, शाखा पालांदुर येथे घडली. वयोवृद्ध, अशिक्षित शेतकरी लक्ष्मण दामा गडपायले (82) राह मरेगांव यांचे खात्यातून 3 ते 4 लक्ष रूपये लंपास करण्यात आले आहे.

        लक्ष्मण दामा गडपायले (82) राह मरेगांव अल्पभुधारक शेतकरी आहेत. यांचे नावाने दि भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल को आँपरेटिव्ह बँक, शाखा पालांदुर येथे खाते असुन क्र. 029030200003153 आहे. खातेदार वयोवृध्द असून अशिक्षित आहे. या खातेदारांची दोन मुले नोकरीवर असुन ते स्वतः शेती पाहत असत या बँक खात्यात शेतमाल विकुन आलेली रक्कम, पिककर्जाची रक्कम तसेच शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या धानाची रक्कम जमा होत असे. या बँक खात्यात अंदाजे 4 ते 4.5 लक्ष रूपये जमा होते. 

         जानेवारी 2014 ते जानेवारी 2022 पर्यंत या खात्यातून अनेक वेळा रक्कम काढली गेली असली तरीही खातेदार अशिक्षित असल्यामुळे हि बाब त्यांच्या लक्षात आली नाही. पण जानेवारी 2022 मध्ये ते आजारी पडल्यामुळे त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले ते 3 ते 4 दिवस दवाखान्यात भरती असतांना त्याचे बँक खात्यातून त्रयस्थाकडुन 35,000/- रुपये काढण्यात आल्याची बाब वारसांना माहिती होताच त्यांनी या खात्याचे बँक स्टेटमेंट मागितले असता मागील सात वर्षांपासून असला गैरप्रकार करुन फसवणुक केल्याचे दिसून आल्याने 11 फेब्रुवारी 2022 रोजी शाखा व्यवस्थापक, दि भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल को आँपरेटिव्ह बँक, शाखा पालांदुर तथा 18 फेब्रुवारी 2022 रोजी अध्यक्ष  व मुख्य कार्यकारी अधिकारी दि भंडारा डिस्ट्रिक्ट सेंट्रल को आँपरेटिव्ह बँक, भंडारा यांचे कडे तक्रार करण्यात आली. तक्रारीची चौकशी करण्यात आली पण दोन आठवड्याचा कालावधी लोटून सुध्दा दोषींवर कारवाई केली गेली नाही. यात शाखा व्यवस्थापकाची संशयास्पद भुमिका दिसून येते.

असे फुटले बिंग 

वयोवृद्ध शेतकरी लक्ष्मण दामा गडपायले हे प्रकृती अस्वस्थामुळे 18 ते 21 जानेवारी 2022 या कालावधीत ग्रामीण रुग्णालय पालांदुर व सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचारासाठी भरती असतांना 18 जानेवारी रोजी 5,000/- आणि 21 जानेवारी रोजी 30,000/- रूपये काढण्यात आले, त्यांनी कोणालाही पैसे काढण्यास सांगितले नाही तथा विड्रालवर आंगठाही दिला नाही त्यामुळे रक्कम काढण्यात आल्याने बिंग फुटले. 

शाखा व्यवस्थापकाची संशयास्पद भुमिका बँक खातेदार ओळखता यावा म्हणून पासबुकवर पासपोर्ट साईज फोटो तर खातेदार अशिक्षित असल्यास बँक कर्मचारी समक्ष विड्रालवर आंगठा घेऊन रक्कम दिली जाते. खातेदार उपस्थित नसताना अथवा रक्ताचे नातेसंबंध नसताना त्रयस्थ व्यक्तीस रक्कम दिली गेल्याने बँक व्यवस्थापकाची संशयास्पद भुमिका दिसुन येते.

प्रतिक्रिया 
लक्ष्मण दामा गडपायले राह मरेगांव यांचे बँकेत खाते असुन त्यांचे खात्यातुन त्रयस्थ व्यक्तीने रक्कमेची उचल केली आहे. बँकेत खातेदारांच्या गर्दीमुळे सदर प्रकार लक्षात आला नाही. 
नरेंद्र ढोरे, शाखा व्यवस्थापक, पालांदुर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत