Breaking News

शेतातील गोठ्याला आग, पाच जनावरासह व शेतीउपयोगी अवजारे आगीत जळून खाक

घातपात असल्याची शक्यता, शेतकऱ्याचे 8 लाखाचे नुकसान 


प्रतिनिधी खेमचंद नेरकर, वरोरा : तालुक्यातील कोंढाला पीडित शेतकरी रवींद्र अहिरकर शेतीचे काम आटोपवून गोठ्यामध्ये शेतीउपयोगी अवजारे व जनावरे बांधून  1 मार्च ला सायंकाळी शेतकरी घरी पोहचला.मात्र नित्याप्रमाणे सकाळी सदर शेतकरी आपल्या शेतात गेला असता आपल्या गोठ्याला आग लागल्याचे 2 मार्च ला उघडकीस आले.आगीमध्ये पाच जनावरे व शेतीउपयोगी अवजारे जळून खाक झाले .मात्र सुदैवाने एका बैलांचा प्राण वाचला. जवळपास शेतकऱ्याचे 8 लाखाचे नुकसान झाले आहे.गोठ्यात विद्युत व्यवस्था नसल्याने शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचा प्रश्नच उदभवत नसून हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे.घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची तसेच प्रशासनाने शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी  शेतकऱ्यासह ग्रा.प,.सदस्य अविनाश पायघन,लक्ष्मण डवरे, भानुदास बोधाने सह ग्रामस्थांनी केली आहे. 

     शेतकरी 1 मार्चला आपले शेतीचे कामे आटोपवून जनावरे व शेतीउपयोगी साहित्य गोठ्यात ठेऊन सायंकाळी घरी परत आला.परंतु रात्रौ दरम्यान गोठ्याला आग लागून गोठ्यात असलेला 8 क्विंटल कापूस ,रासायनिक खतांच्या 10 पिशव्या ,शेतीउपयोगी साहित्य,तसेच दोन बैल,एक गाय, गोरा,कालवड यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.यामध्ये शेतकऱ्यांचे जवळपास 8 लाखाचे नुकसान झाले आहे.आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही.मात्र हि आग द्वेष भावनेतून कोणीतरी लावली असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे.हा घातपात असल्याचा आरोप होत असून संबंधित प्रशासनाने घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करून शेतकऱ्याला  न्याय मिळावा अशी मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत