Breaking News

स्त्री भृण हत्या रोखण्यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन

स्त्री भृण हत्या रोखण्यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन



महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी, सुखसागर झाडे,गडचिरोली : समाजात अजूनही स्त्री बद्दल अनेक दुय्यम भूमिका आहे. अनेक ठिकाणी स्त्री भ्रूण हत्या वाढतच आहे .स्त्री भ्रूण हत्या वाढू नये समाजात स्त्री पुरुष समानता रुजविण्यासाठी आज महिला दिनाच्या निमित्ताने ग्रामीण रुग्णालय आष्टी,ग्रामीण रुग्णालय चामोर्शी, होप फौंडेशन सिरोंचा यांच्या संयुक्त विद्यमाने न गर्भधारणा पूर्व व प्रसुती पूर्व गर्भ लिंग निदान तंत्र(बेकायदेशीर गर्भ लिंग निदान आणि गर्भपात) या कायद्याबद्दल जनजागृती करण्यासाठी  नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल विक्रमपूर जयनगर येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले.

      सदर शिबिराचे उद्घाटक ग्रामीण रुग्णालय आष्टीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ बिधान देवरी तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण रुग्णालय चामोर्शी चे वैद्यकीय अधिक्षक डॉ. आय. जी. नागदेवते तर प्रमुख अतिथी होप फौंडेशन सिरोंचा चे संचालक नागेश मादेशी ,तर कावडे सर, मंडल सर आदी मान्यवर उपस्थित होते.
    डॉ. बिधान देवरी आणि डॉ आय. जी. नागदेवते यांनी रॅलीला हिरवी झेंडा दाखवुन रॅलीचे रीतसर उदघाटन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत