दहेगावचे मोक्षधाम बणले गावातील एक धार्मिक स्थळ !
दहेगावचे मोक्षधाम बणले गावातील एक धार्मिक स्थळ !
महाशिवरात्रीच्या पर्वावर भोलेनाथाची प्राणप्रतिष्ठा व कीर्तन
महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी वरोरा : मोक्षधाम म्हटले की समाजात वेगळे स्थान असल्याची कल्पना सर्वसामान्याच्या मनात निर्माण होते मात्र तालुक्यातील दहेगाव येथील मोक्षधामाची प्रचिती वेगळी निर्माण करण्यात आली आहे.येथील मोक्षधाम धार्मिक व रमणीय ठिकाण बनवण्याचा मोठा प्रयत्न येथील सरपंच विशाल पारखी यांनी केला असून त्यांचा तो सफल झाला आहे. मोक्षधाम ठिकाणी शंकराची मूर्ती असावी हे कल्पना सर्वश्रुत आहे, त्याचाच ध्यास घेऊन सरपंच विशाल पारखी व त्यांच्या गावातील संपूर्ण सहकार्यच्या मनामध्ये ती कल्पना निर्माण झाली व त्यांनी लोकसहभागातून महाशिवरात्रीच्या पर्वावर शंकराची मूर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.गावकऱ्यांनी भजन पूजन व कीर्तन सोहळा च्या माध्यमातून भोलेनाथाच्या मूर्तीची स्थापना झाली.
मोक्षधाम हे एक आत्मशांतीचे स्थळ असावे ही कल्पना प्रत्यक्षात निर्माण होणे व साकार करणे साधे सोपे काम नव्हे मात्र दहेगाव वासीयांनी प्रत्येक्षात कल्पना उतरविली आहे.
वरोरा तालुक्यातील दहेगाव येथील स्मशानभूमीतील रमणीय दृश्य अनुभवूनआश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. या स्मशानभूमीत महाशिवरात्रीच्या शुभपर्वावर हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्री शंकरजींच्या मूर्तीची स्थापना करणे हे एक शिवभक्ताच्या श्रद्धेचा एक जिव्हाळ्याचा विषय आहे यादरम्यान कीर्तनाचा सोहळा झाला व शेवटी मूर्तीची स्थापना झाली. ह्या ठिकाणी एक आत्मशांती चे एक आध्यत्मिक केंद्र बनले आहे.
वरोरा तालुक्यातील दहेगाव हे वरोरा जवळील एक आदर्श गाव म्हणून आधीच ओळखले जाते. औद्योगिक वसाहतीचा परिसर जरी असला तरी विकासकामांसाठी या ग्रामपंचायतीला बऱ्यापैकी निधी सरपंच यांनी प्राप्त करून घेतात. या निधीचा सदुपयोग उत्तमरित्या खर्च केल्याचे गावातील प्रत्यक्ष भेटीदरम्यान दिसून येते. सदर मोक्षधामस्थित 'फुलांची झाडे प्रत्येक प्रकारची झाडे, रस्ते, नाला सुशोभीकरण करण्यात आले. गावात सुद्धा प्रकाश व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था एवढेच नव्हे, तर वृक्षारोपण यावर या ग्रामपंचायतीने विशेष भर दिला आहे. ह्या सर्व सुविधांमुळे अंगणवाडीला आयएसओ नामांकन प्राप्त झाले आहे. सरपंच विशाल पारखी यांनी पुढाकार घेऊन दहेगाव येथील सर्व पांदण रस्त्यांची मोजणी करून घेतली आहे. स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण ,. दोन वर्षात ५ हजार ५०० झाडांची लागवड गावात आणि स्मशानभूमीत व रस्त्याच्या दुतर्फा केल्याचे सरपंच यांनी सांगितले.
स्मशानभूमीत फूल, फळझाडे आणि औषधीयुक्त अशा साडेतीन हजार झाडांचा समावेश आहे. सदर स्मशानभूमीतील रंगरंगोटी आणि वृक्ष लागवडीमुळे परिसर सुंदर बनलेला आहे. महाशिवरात्रीच्या पर्वावर गावातून दिंडी च्या माध्यमातून मिरवणूक काढण्यात आली. यानंतर स्मशानभूमीतच ह.भ.प. केशवराव खिरटकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थांसह परिसरातील शेकडो नागरिक उपस्थित होते. कीर्तनकार महाराजांनीसुद्धा आपल्या कीर्तनातून स्मशानभूमीतील नटलेल्या परिसराचे कौतुक केले. यावेळी वरोरा येथील नगराध्यक्ष अहेतेशाम अली, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अॅड. मोरेश्वर टेमुर्डे, मनसेचे नेते रमेश राजूरकर यांनी भेट दिली. सरपंच विशाल पारखी, नायदेव चे पोलीस पाटील जीवतोडे व खरेदी विक्री संघाचे संचालक बाळू भोयर यांनी आपल्या मनोगतातून ग्रामस्थांचे भरभरून कौतुक केले. यावेळी ग्रामसेवक तुळशीदास लांजेवार, उपसरपंच कविता पंढरी घुगल, ग्रामपंचायत सदस्य धीरज कवडू कोठे, नाना गोखरे, विलास ढगे, विठ्ठल बोधाने, गजानन माहुरे, हरी डाहुले, दत्तू टाले, तुषार खिरटकर, पंढरी घुगल, जंगलुजी साळवे तसेच गावातील व परिसरातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन साळवे सर यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत