Breaking News

नवेगाव बांध जवळ आढळला दुर्मिळ प्राच्य आर्ली

नवेगाव बांध जवळ आढळला दुर्मिळ प्राच्य आर्ली


महा घडामोडी न्यूज संतोष रोकडे, अर्जुनी मोरगाव ; नवेगाव बांध आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर विविध प्रजातींच्या पक्ष्यांना आकर्षित करणारा आहे. जवळच असलेल्या सिरेगाव बांध तलाव परिसरात पक्षीप्रेमी प्रा. अजय राऊत आणि डॉ . शरद मेश्राम यांना दुर्मिळ आणि आकर्षक प्राच्य आर्ली पक्ष्याचे दर्शन झाले. मार्च महिना सुरू झाला अर्जुनी मोरगाव परिसरात तलावांमधील स्थलांतरित पाणपक्ष्यांची संख्या  अद्यापही कमी झाल्यासारखी वाटत नाही. हा प्राच्य आर्ली असाच उन्हाळ्यात आपल्याकडे येणारा पक्षी आहे. आजपर्यंत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात या पक्ष्याला पाहिल्याची नोंद नाही. तालुक्यात नवेगाव बांध जवळच्या परिसरातील बीड , भुरशी टोला, एरंडा तसेच शिरेगाव बांध सारखे अनेक तलाव स्थलांतरित पक्ष्यांचे आवडते ठिकाण आहे.

-75% OFF OFFER

इलेक्ट्रॉनिक पोर्टेबल हुक प्रकार डिजिटल एलईडी स्क्रीन सामानाचे वजन स्केल, 50 kg/110 Lb

सध्या सिरेगाव बांध येथे  इतर स्थलांतरित पाण  पक्ष्यांसोबत प्राच्य आर्ली  हा देखणा पक्षी बघावयास मिळत आहे . पक्षाला ग्रास होप्पर बर्ड सुद्धा म्हणतात कारण हा टोळ फार आवडी ने फस्त करतो
हा पक्षी उन्हाळ्यात आपल्या भागात स्थानांतरण करून येतो. बहुदा अगदी कमी संख्येच्या समूहात दिसतो, यावेळी सुमारे चाळीस च्या संख्येत विखुरलेल्या समूहात दिसला.प्राच्य आर्ली सारखा फार क्वचित दिसणारा पक्षी एवढ्या संख्येने दिसणे म्हणजेच पक्षी प्रेमींसाठी एक पर्वणीच आहे.



प्राच्य आर्ली या पक्ष्याची काही वैशिष्ट्ये

 सरासरी लांबी 23 ते 24 सेंटीमीटर असते. शरीराच्या तुलनेत याचे पाय आकाराने लहान असतात पंख लांब व टोकदार असतात . पंखांचा रंग गव्हाळ असून टोकावर काळी झालर दिसते.चोच लहान आकाराची,टोकावर काळ्या रंगाची तर वरील भागात चटक लालसर  शेंद्री रंगाची असते. प्राच्य आर्ली हा पाणपक्षी आहे. साधारणतः पाणपक्षी जमिनीवर कीटकांची शिकार करतात परंतु याची वैशिष्ट्यपूर्ण चोच असल्यामुळे हवेतच उडताना हे कीटकांची शिकार करतात. प्रमुख खाद्य किडे, कृमी, गांडूळ, कोळी आणि विशेषतः टोळ आहे.नर व मादी दिसायला सारखे असतात. हा आपल्या भागात उन्हाळी स्थलांतरित पक्षी आहे.

30% OFF OFFER

Happilo 100% Natural Premium Californian Almonds Value Pack Pouch,Dried,500g


 गवताळ भाग, पानथळ व दलदल परिसरात यांचे  वास्तव्य असते.  शेपटी लांब तसेच काटेरी असल्यासारखे असते . शेपटी च्या ठिकाणी दोन काडी सारखे पंख बाहेर च्या बाजूला निघालेले दिसतात.  हा पक्षी बसला असता शेपटीची वैशिष्ट्ये  सहज बघता येतात. याचा पोटाकडील भाग हलका शेंद्री पांढरा,डोके आणि पाठ तपकिरी असते. गळ्याचा भाग शेंदरी रंगाचा,गळ्यावर एक काळ्या रंगाची गळपट्टी, शेंदरी रंग आणि या काळ्या गळपट्टी यामध्ये एक पांढऱ्या रंगाची माळ घातल्यासारखी वाटते. ही काळी गळपट्टी व पांढरी माळ प्राच्य आर्ली च्या दोन्ही डोळ्यांना इंग्रजीतील यू आकाराने जोडल्या सारखी दिसते . गळा शेंदरी, पांढरी माळ, काळी गळपट्टी आणि उर्वरित गव्हाळ रंग या मुळे हा पक्षी खूप नटलेला दिसतो. डोळ्यात खालील बाजूला असलेली पांढरी किनार सौंदर्याला अजून उठावदार बनवितात. शेपटी कडील पंख काळे असतात. प्राच्य आर्ली जमिनीवरच घरटे बनवितो. घरटे टिटवी च्या घरट्या सारखे असते. घरट्यात एकावेळी दोन ते तीन अंडी घालतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत