श्री अखिलेशवर सिंह डी,आय,जी अकॅडमीतून प्रशिक्षणार्थ्यांनी उज्वल यश संपादन करावीत - मा राज्यमंत्री संजय बनसोडे
श्री अखिलेशवर सिंह डी,आय,जी अकॅडमीतून प्रशिक्षणार्थ्यांनी उज्वल यश संपादन करावीत - मा राज्यमंत्री संजय बनसोडे
महा घड़ामोडी न्यूज प्रतिनिधी बालाजी सुवर्णकार,उदगीर : श्री अखिलेशवर सिंह डी आय जी अकॅडमी तून प्रशिक्षणार्थ्यांनी चांगला सराव करून या अकॅडमी तून विद्यार्थ्यांनी अधिक सराव करून उज्वल असे यश संपादन करावे तसे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले ते श्री अखिलेशवर डी आय जी अकॅडमीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते याप्रसंगी विचारपीठावर माजी आमदार गोविंदांना केंद्रे रिपाईचे जिल्हाध्यक्ष देविदास कांबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते राज्यमंत्री संजय बनसोडे म्हणाले की या अकॅडमी मधील प्रशिक्षणार्थ्यांनी अहोरात्र मेहनत व जिद्द चिकाटीने यशस्वीरीत्या प्रशिक्षण पूर्ण केल्यास उज्वल नक्कीच यश प्राप्त करता येते असेही ते म्हणाले यावेळी अकॅडमी तील प्रशिक्षणार्थ्यांचे कौतुक करून भरभरून शुभेच्छा दिल्या व प्रशिक्षणासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदी करण्यासाठी वीस लाख रुपयांचा निधी त्यांनी जाहीर करून यापुढेही लागेल ती ही मदत करण्याचे आश्वासन दिले अध्यक्षीय समारोप प्रसंगी गोविंदांना केंद्रे यांनी ही अकॅडमीची कौतुक करून शुभेच्छा दिल्या या प्रसंगी मंचावरील सर्व उपस्थित मान्यवरांचा अकॅडमी च्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी सुवर्णकार यांनी केले तर आभार प्रदर्शन अकॅडमीचे मुख्य संचालक बालाजी गडकर यांनी केले या उद्घाटन सोहळ्यास प्रशिक्षणार्थी त्यांचे पालक नातेवाईक व शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत