Breaking News

तालुक्याच्या विकासासाठी प्रहार रुग्णसेवक जिवन तोगरे (पत्रकाराचा) लढा

तालुक्याच्या विकासासाठी प्रहार रुग्णसेवक जिवन तोगरे (पत्रकाराचा) लढा


महा घडामोडी न्यूज तालूका प्रतिनिधी शेख हक्कानी, जिवती :- जिवती हा चंद्रपूर जिल्ह्यातील तालुका दुर्गम आणि डोंगराळ भाग. त्यामुळं विकासापासून कोसो योजने दूर तालुका झाल्यावर विकास होईल हे जिवतीकरांचे स्वप्न हवेतच विरले. जिवतीच्या विकासावर लोकप्रतिनिधी देखील कायम मौन पाळले. लोकप्रतिनिधी बोलत नाहीत म्हटल्यावर प्रहार संघटनेचे रुग्णसेवक जिवन तोगरे पुढे आले आणि त्यांनी जिवती तालुक्यातील  विविध समस्या सुटाव्यात यासाठी आमरण उपोषण सुरू केले. 


तालुक्यातील पत्रकारांनी व जय विदर्भ पार्टी व विदर्भ राज्य आंदोलन समितीचे सुदाम राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुकेश चव्हाण,लहुजी ब्रिगेड कुभेझरी चे बळिराम भालेराव, मुलनिवासी समिती अध्यक्ष एल. डी. मंगाम, युवक काँग्रेस जिवती चे कंटू कोटनाके, ग्राम आरोग्य फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ प्रविण येरमे  सर,  शेतकरी संघटनेचे उपध्यक्ष विनोद पवार, आम आदमी पार्टीचे सुनिल राठोड गोविंद गोरे उपोषण स्थळी जाऊन भेट घेतली आणि तोगरे यांना पाठिंबा दिला आहे. बातमी देणं एवढंच पत्रकारांचं काम असतं असे अनेकांना वाटतं. मात्र ते खरं नाही व्यवस्था निष्क्रीय असेल तर हातात चाबूक घेऊन रस्त्यावर उतरणं हे देखील पत्रकारांचं काम आहे असं आम्ही मानतो तालुक्यातील पत्रकारांनी ही जबाबदारी अनेक वेळा समर्थपणे पार पाडली आहे. 

जिवती तालुक्यातील विविध समस्याचा लढा नक्कीच यशस्वी होईल आता जिवती तालुक्यासचा विकासासाठी देखील एक प्रहार रुग्णसेवक तथा (पत्रकारच) पुढे आला आहे. तालुक्यातील  विकासाचा प्रश्न हाती घेऊन एक प्रहार रुग्णसेवक जिवन तोगरे (पत्रकार) उपोषणास बसतो ही जिल्ह्यातील तथा तालुक्यातील सरपक्षीय पुढारयांना चपराक आहे. त्यांनी आता तरी तळयाकडे मतांसाठी नव्हे तर विकासासाठी लक्ष द्यावे 
आम्ही सारे रुग्णसेवक जिवन तोगरे बरोबर आहोत.

प्रमुख मागण्या

१) जिवती तहसिल कार्यालयातील सेतु विभागात होत असलेल्या सामान्य माणसाची लूट तत्काळ थांबवण्यासाठी 

२) जिवती तालुक्यातील तहसिल कार्यालयात नायब तहसीलदार यांची तत्काळ नियुक्ती करण्यात यावी व इतर रिक्त पदे भरण्यात यावे

३) जिवती तालुक्यात सुरु असलेल्या रस्ताचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे बनत आहे यांची तत्काळ चौकशी करुन तालुक्यातील रस्ताचे काम उकृष्ट दर्जाचे करण्यात यावे.

४) जिवती शहरातील आरो फिल्डर मिशन मागील दोन वर्षांपासून बंद आहे हे मिशन तत्काळ सुरू करण्यात यावे.

५) कुभेझरी येथिल उप. प्राथमिक आरोग्य केंद्रात तत्काळ डॉ ची नियुक्ती करुन नागरिकांना आरोग्य सेवा देण्यात यावे. 

६) स्वातंत्र विदर्भ राज्य देण्यात यावे. 

७) जिवती तालुक्यातील शेतकर्‍यांना तत्काळ शेतीचे पट्टे देण्यात यावे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत