Breaking News

नितीन भटारकर यांच्या क्षयरोग रुग्णांसाठीच्या कार्याची घेन्यात आली दखल


प्रतिसाद बहुउध्येशिय विकास संस्था, चंद्रपूर च्या कार्याचा सत्कार


महा घडामोडी न्यूज नेटवर्क चंद्रपूर :-  टीबी संपविण्यासाठी गुंतवणूक करा व जीव वाचवा " या घोषवाक्याला समोर ठेवून २४ मार्च "जागतिक क्षयरोग दिन" निमित्ताने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा क्षयरोग कार्यालय, रामनगर येथून जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते.  याप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक मा. डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा क्षयरोग अधिकारी मा.डॉ. प्रकाश साठे यांच्या नेतृत्वाखाली रॅली ला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली.

रॅली ही जटपुरा गेट मार्गे आझाद गार्डन, जिल्हा सामान्य रुग्णालय पासून जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे सांगता करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांना क्षयरोगा संबंधित माहिती पत्रकांचे वाटत करण्यात आले.
जिल्हा परिषद ,चंद्रपूर येथील मा.सा. कन्नमवार सभागृह येथे मार्गदर्शन व क्षयरोग आजारासंदर्भात जनजागृती व रुग्णांना दिलेल्या सेवाप्रति उत्कृष्ट कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्था, शाळा, वैद्यकीय संस्था यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमावेळी क्षयरोग दुरीकरणासाठी क्षयरोग रुग्णांना कोरोना काळात केलेल्या राशन किट वितरणाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या प्रतिसाद बहुउध्येशिय विकास संस्था, चंद्रपूर चे नितीन भटारकर यांचा त्यांनी केलेल्या कार्या बद्दल सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

 कार्यक्रमाचे उद्घाटक अप्पर जिल्हाधिकारी मा. विद्युत वरखेडकर ,कार्यक्रमाचे अध्यक्ष  मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.चंद्रपूर मा. डॉ. मिताली सेठी, प्रमुख मार्गदर्शक व प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक मा.डॉ.निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी मा.डॉ.राजकुमार गहलोत, जिल्हा क्षयरोग अधिकारी मा.डॉ.प्रकाश साठे, आय.एम.ए. अध्यक्ष मा.डॉ.मंगेश गुलवाडे, कुष्ठरोग संचालक मा.डॉ. गेडाम, डॉ.किन्नाके , टीबी विभागाचे श्री. किशोर माणुसमारे यांची उपस्थिती होती.  

 यावेळी उपस्थित मान्यवरांनी यापुढे देखील आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा उपलब्ध करून जास्तीत जास्त संशयित रुग्णांची क्षयरोग तपासणी करून त्यांना औषधोपचार देणे गरजेचे असल्याचे सांगितले. 

यासाठी ग्रामीण स्तरावरील आशा, आरोग्य सेविका ,वैद्यकीय अधिकारी यांना संशयितांची तपासणी, औषधोपचार व पाठपुरावा करण्याबाबत सूचना केल्या.  कार्यक्रमाला टीबी विभागाचे कर्मचारी तसेच ,शासकीय परिचारिका महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीं, शाळा - महाविद्यालयाचे कर्मचारी तसेच प्रतिसाद बहुउध्येशिय विकास संस्थेचे श्री. विशाल जोगी, श्री. गणेश बावणे, श्री.पवन कांत, श्री. सचिन संतोषवार यांची उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत