ऑनलाइन परीक्षेची मागणी करत अमरावती विद्यापिठातील विद्यार्थ्यांची विद्यापीठावर विद्यार्थी आक्रोश धडक मोर्चा
ऑनलाइन परीक्षेची मागणी करत अमरावती विद्यापिठातील विद्यार्थ्यांची विद्यापीठावर विद्यार्थी आक्रोश धडक मोर्चा...
महा घडामोडी न्युज नेटवर्क,अमरावती : दिनांक २५/०४/२०२२ रोजी अमरावती विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी आपल्या रास्त असलेल्या मागण्या संदर्भात अमरावती विद्यापीठात हजारो संख्येने आंदोलकांच्या स्वरूपात धडकले असताना कुलगुरु महोदयांसोबत भेटण्याचा आग्रह धरला परंतू कुलगुरु महोदयानी तात्पुरता भेट नाकारली असताना विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात जमाव करत घोषनाबाजी व निदर्शने करुन कुलगुरु महोदयांना भेटायला भाग पाडले व चर्चा करण्याकरीता बैठक आयोजित करण्यात आली असताना विद्यार्थी प्रतिनिधी नी आपल्या ऑनलाईन परीक्षेसंदर्भात पर्याय उपलब्ध करुन द्यावा त्यानुषंगाने विद्यार्थ्यांनी वेदना मांडल्या जसे-ऑफलाइन आयोजन हे कोणतेही नियोजन नसताना करने अयोग्य आहे अनेक बाबी विद्यार्थ्यांच्या समजून घेतल्याच पाहिजे प्रवास,निवास,मानसिक आरोग्य,लसीकरण,अनेक समस्या विद्यार्थ्यांना भेडसावत असुन महाविद्यालयाची पटसंख्या सुद्धा लक्ष्यात घेतलेले नाही तसेच कोरोना संक्रमनाची भीती अजुन ही राज्यात टळलेली नसुन कोणत्याही प्रकारे खबरदारी घेतल्या जात नाही आहे मग विद्यार्थ्यांवरच प्रयोग करने का सुरु आहे?? असा प्रश्न विद्यापीठ प्राशासनाला विद्यार्थी प्रमुख प्रतिनिधी जीत पवार,विधी महाविद्यालय यवतमाळ यानी विचारला असताना कुलगुरु महोदयांनी मागण्यासंदर्भात गांभीर्याने विचार करत दखल घेतली असुन विद्यार्थ्यांच्या मागण्या अगदी रास्त असुन विद्यापीठाला पुर्णपणे मान्य आहे व त्यावर मा.मंत्री महोदय सामंत साहेब यांच्या सोबत चर्चा करणार असुन लवकरच विद्यार्थ्यांचा हिताचे निर्णय घेतले जाईल असे आश्वासन मा.कुलगुरु महोदयांनी लेखी स्वरुपात दिलेला आहे तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्या पुर्ण न झाल्यास या पेक्षाही तीव्र आंदोलन उभे करु त्याला सर्वस्व जबाबदार विद्यापीठ प्राशासन असेल असे वक्तव्य विद्यार्थी प्रमुख प्रतिनिधी जीत पवार यांनी बैठकी दरम्यान केले त्यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी वैभव इडके,साक्षी सावंतकर,अनुराग मोखाडे,सुरज किन्नाके,राजेश कराळे,अक्षय पाटिल,शाहरुख काझी,राहुल मानेकर,काजल जाधव,संपदा ठाकरे,योगेश पाटिल,झाकिर हुसेन,असद रजा,किरण अर्धापुरे,गजानन जानकर,रुशभ हारगुडे,शुभम नरमशेट्टीवार,शुभम पुंडकर,हेमंत कापसे,श्रीकांत आडे,शुभम गोमासे,निकेत तांगडे सोबत च यवतमाळ,अमरावती,अकोला,वाशिम,बुलढाणा येथील हजारो विद्यार्थी प्रमुख्याने उपस्थिती होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत