6 वर्षाच्या मुलगी अश्मिरा फातेमा शेख रियाज मनियार. हीने ठेवला पहिला उपवास ( रोज़ा)
6 वर्षाच्या मुलगी अश्मिरा फातेमा शेख रियाज मनियार. हीने ठेवला पहिला उपवास ( रोज़ा)
महा घडामोडी न्युज नेटवर्क, बोदवड : पवित्र रमजान महिन्यात बोदवड शहरातील रियाज शेख दस्तगीर मनियार यांची मुलगी अश्मिरा फातेमा यांचा हीने आपल्या जीवनाचा पहिला रोजा पूर्ण केला.
सध्याचे तापमान आणि रखरखत्या उन्हाळ्यात पहाटे सकाळी पाच वाजेला सहेरी(जेवण) करून ते सायंकाळी सात वाजेपर्यंत ना अन्न ना पाणी घेता उपाशी पोटी राहून अशमीरा फातेमा ने अल्लाह प्रती श्रद्धा व्यक्त केली. सध्या बोदवड शहराचे तापमान 43 ते 44 अं.से. तापमानाची पातळी बघावयास मिळत आहे. इतक्या उन्हात सामान्य माणसाल बाहेर फिरणे कठीण होत आहे, पौढाना त्रास होत आहे इतक्या कठीण परिस्थितीत रखरखत्या उन्हात अशमीरा फातेमा हीने अल्लाह प्रति आपली श्रद्धा व्यक्त करत रमजान चा उपवास यशस्वीरित्या पूर्ण केला.
वयाच्या 6 व्या वर्षी आपल्या जीवनाचा रमजान चा पहिला रोजा(उपवास) पूर्ण केल्याबद्दल या अशमिरा फातेमा याचे सर्वत्र कौतुक होत आहे...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत