Breaking News

घरफोडी करणारा चोर रामनगर पोलीसांचे जाळ्यात

घरफोडी करणारा चोर रामनगर पोलीसांचे जाळ्यात



महा घडामोडी न्युज नेटवर्क, वर्धा : फिर्यादी श्री. विजय तानबाजी बेले. रा. गोपाळनगर, कारला रोड, वर्धा हे दिनांक १७.०४.२०२२ रोजी त्यांचे घराचे मुख्य दाराला कुलूप लावुन कुटुंबासह शेगाव येथे देव दर्शनासाठी गेले व दिनांक १९.०४.२०२२ रोजी सायंकाळी ०५.०० वा. दरम्यान घरी परत आले असता त्यांचे घराचे मुख्य लाकडी दरवाज्याचे कुलुप तुटलेले दिसले व घराचे बेडरुममध्ये असलेल्या आलमारीच्या लॉकरमधुन १) चांदीच्या तोरड्याचे जोड २० ग्रॅम किं. २०००/- रु., २) चांदीचे पायाचे जोडवे वजन १० ग्रॅम किं. ७००/- रु. असा एकुण जु.कि. २७००/- रु. चा माल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेला. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्टवरुन पो.स्टे. रामनगर येथे अप.क्र. ३५८ / २०२२ कलम ४५४,४५७,३८० भा.दं. वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


सदर गुन्ह्याचे तपासात गुप्त बातमीदाराकडुन मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरुन आरोपी सुरज राजु लष्कर, वय २२ वर्ष, रा. आर्वी नाका, वर्धा यास ताब्यात घेवून त्या गुन्ह्यासंबंधाने विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याचेकडुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल १) चांदीच्या तोरड्या जोड वजन अंदाजे २० ग्रॅम अंदाजे कि. २००० रु., २) चांदीचे पायाचे जोडवे अंदाजे वजन १० ग्रॅम किंमत अंदाजे कि. ७०० रु. असा एकुणजु. कि. २७०० रु. चा माल हस्तगत करुन गुन्हा उघडकीस आणण्यात आला.


सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, वर्धा श्री. पियुष जगताप यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. एच. जी. चांदेवार यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस अंमलदार नरेन्द्र पाराशर, पंकज भरणे, संदिप खरात, अजित सोर, अजय अनंतवार सर्व नेमणुक पो.स्टे. रामनगर यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत