Breaking News

पाडळी रांजणगाव येथे तीन लाख शौचालय अनुदान वर्ग

पाडळी रांजणगाव येथे तीन लाख शौचालय अनुदान वर्ग



महा घडामोडी न्युज प्रतिनिधी, पारनेर : पाडळी रांजणगाव येथे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत 25 लाभार्त्यांना 12 हजार प्रमाणे 3 लाख रुपये खात्यावर वर्ग झाले असल्याची माहिती पाडळी रांजणगावचे सरपंच विक्रमसिंह कळमकर उपसरपंच सौ. वैशाली करंजुले यांनी दिली आहे.


     स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सन २०१२ मध्ये करण्यात आलेल्या पायाभूत सर्वेक्षणात शौचालय अनुदानासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांना शौचालय बांधून त्याचा नियमित वापर केल्यानंतर १२ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येते.


  या योजने अंतर्गत वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामासाठी 12 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या बारा हजार रूपयात केंद्राचा हिस्सा 75 टक्के म्हणजे नऊ हजार रुपये तर राज्याचा हिस्सा 25 टक्के म्हणजे तीन हजार रूपये इतका आहे.
          


 
विकास कामामुळे गावाचा कायापालट !
पाडळी रांजणगाव या गावाच्या विकासासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत.गावात विविध शासकीय योजना राबविण्यात आल्या आहेत. तसेच जवळ जवळ कोट्यावधी रुपयांचा निधी गाव विकासासाठी मंजूर करून आणला आहे त्यामूळे विकास कामाच्या माध्यमातून गावाचा कायापालट झाला आहे.
विक्रमसिहं कळमकर
सरपंच पाडळी रांजणगाव
वैशाली करंजुले उपसरपंच
पाडळी रांजणगाव



 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत