भाजपा प्रणित महानगरपालिका सदैव विकासासाठी कटिबध्द - डॉ.मंगेश गुलवाडे
नगरसेवक प्रदीप किरमे यांच्या पुढाकाराने मंजूर झालेल्या बाबुपेठ येथील रस्त्याचे भूमिपूजन संपन्न
महा घडामोडी न्यूज नेटवर्क चंद्रपूर ; चंद्रपूर शहरातील बाबूपेठ प्रभाग क्र.13 मधील राधाकृष्णा चौक ते अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम ते सातपुते यांच्या घरापर्यंत रस्ता नगरसेवक प्रदीप किरमे यांनी पुढाकार घेऊन मंजूर करून आणला त्या रस्त्याचे भूमिपूजन पार पडले त्याप्रसंगी भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की भाजपा प्रणित महानगरपालिका सदैव विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन कार्य करणारी असून प्रभागातील नगरसेवक सुध्दा समस्या सोडविण्यासाठी सैदव कटिबध्द असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सदर भूमिपूजन प्रसंगी प्रभागातील जेष्ठ नागरिक जगदिशराय बहेल, महानगर सचिव रामकुमार आकापल्लीवार,राकेश बोमनवार, अमित निरंजने,युवा मोर्चा मंडळ अध्यक्ष हिमांशु गादेवार, उपाध्यक्ष मयुर बहेल, भाजयुमो उपाध्यक्ष कुनाल गुंडावार, पवन ढवळे,अमोल नगराळे, मनिष अलमस्त, ओबीसी मोर्चा मंडळ अध्यक्ष सुभाष ढवस,रेखा चन्ने, विद्या बातो, माया पडवेकर, अर्चना उरकुडे , सर्वश्री ढोंगडे,श्रेयस दातारकर, प्रसाद आकेपल्लीवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती तर प्रभागातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत