Breaking News

पहिल्यांदाच वरोऱ्यात विदर्भ स्तरीय पुरुषांचे खो-खो सामने

पहिल्यांदाच वरोऱ्यात विदर्भ स्तरीय पुरुषांचे खो-खो सामने


महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी,खेमचंद नेरकर, वरोरा ; वरोऱ्यातील  आनंद निकेतन
महाविद्यालय,लोकमान्य शाळा,महाविद्यालय,हिरालाल लोया विद्यालय ,महाविद्यालय,या नामवंत शिक्षण संस्थांमधून व्हॉलीबॉल, कबड्डी,खो-खो चे खेळाडू राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे.शिक्षणासह विद्यार्थ्याचे आरोग्य सदृढ राहावे तसेच त्यांचे जीवन घडावे यासाठी खेळाडू तयार करण्यासाठी प्रशिक्षित प्रशिक्षक अविरत मेहनत घेत असतात.

  वरोऱ्यात दरवर्षाला कबड्डी व व्हॅलीबाल या खेळाचे विदर्भ स्तरीय सामन्यांचे आयोजन केले जातात.परंतु पहिल्यांदाच विदर्भस्तरीय सामन्यांचे छत्रपती संभाजी महाराज बहुउद्देशीय स्पोर्टिंग असोसिएशन वरोरा द्वारा आयोजित विदर्भ स्तरीय पुरुषांचे खो-खो सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे.सदर सामन्यांचे उदघाटन 11 एप्रिल 2022 ला क्रीडा संकुल वरोरा येथे पार पडणार आहे.

  सदर सामन्यांचे उदघाटक म्हणून रविभाऊ शिंदे,रामेशजी राजूरकर,कासिफखान हे तर प्रमुख अतिथी मुकेश जीवतोडे,अहेतेशाम अली,विलास नेरकर,बंडू डाखरे,दत्ता बोरेकर,पोलीस निरीक्षक खोब्रागडे,अमोल पिसे,देशमाने सर यांची प्रामुख्याने उपस्थिती राहणार आहे.सामन्यांमध्ये प्रथम बक्षीस 10000,द्वितीय बक्षीस 7000 तृतीय बक्षीस 5000 हजार रुपये ठेवण्यात आले आहे.असे मंडळाचे सचिव भूषण सूर्यवंशी,प्रशिक्षक अल्ताप पठाण,प्रकाश नाकाडे ,मंगेश दोडके यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत