महावीर जयंती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कत्तलखाने, मांस विक्रीची दुकाने बंद
महावीर जयंती व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त कत्तलखाने, मांस विक्रीची दुकाने बंद
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,नागपूर : 'महावीर जयंती' दिनाला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार गुरूवार दिनांक १४ एप्रिल, २०२२ ला 'महावीर जयंती' दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील.
तसेच 'भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती' दिनानिमित्त गुरूवार दिनांक १४ एप्रिल, २०२२ ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या दिनांक ०२/०९/२०१८ रोजीच्या स्थगित साधारण सभेतील मंजुर ठराव क्र. २४० दिनांक ०२/०७/२०१८ अन्वये मा.आयुक्त यांचे दिनांक ०३/०८/२०१८ चे मंजुरी नुसार नागपूर शहरतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार गुरूवार दिनांक १४ एप्रिल, २०२२ ला 'भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती' तथा 'महावीर जयंती' दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेच्या भरारी पथकाव्दारे कार्यवाही करण्यात येईल, अशी सूचना उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन विभाग डॉ.गजेंद्र महल्ले यांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत