समर्पित आयोग शनिवारी नागरिकांची मते जाणून घेणार
समर्पित आयोग शनिवारी नागरिकांची मते जाणून घेणार
शुक्रवारपर्यंत नोंदणी करणे आवश्यक
विभागीय आयुक्त कार्यालयात नागरिकांना भेटणार
रक्तदाब नियंत्रणासाठी नियमित रक्तदाबाची तपासणी करावी
ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने शनिवार, दिनांक 28 मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात सायंकाळी 4.30 ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत नागरिकांची मते जाणून घेणार आहेत.
या समर्पित आयोगाच्या भेटीच्यावेळी नागरिकांना आपली मते वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी करणे आवश्यक आहे. ही नोंदणी शुक्रवार, दिनांक 27 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत करावी. तसेच यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात संपर्क करावा, असे आवाहन या समर्पित आयोगाचे सदस्य सचिव पंकजकुमार यांनी केले आहे.
विभागीय आयुक्तांनी घेतला आढावा
समर्पित आयोग शनिवार, दिनांक 28 मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदने स्वीकारणार असल्यामुळे व्यवस्थेसंदर्भात विभागीय आयुक्त डॉ. श्रीमती माधवी खोडे-चवरे यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला तसेच विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
माजी मुख्य सचिव श्री. जयंतकुमार बांठिया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित आयोग नागरिकांचे निवेदने स्वीकारणार आहेत. आयोगासमोर निवेदने देण्यासाठी आपली मते वेळेत मांडता यावीत यासाठी विभागीय आयुक्त कार्यालय कार्यालय येथे यादृष्टीने संपूर्ण व्यवस्था करावी, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे यांनी दिल्यात. आयोगाचे काम सुरळीत व्हावे यादृष्टीने करण्यात येत असलेल्या व्यवस्थेसंदर्भात जिल्हाधिकारी आर. विमला यांनी पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात..
जागतिक उच्च रक्तदाब दिन व सीपीआर प्रशिक्षण कार्यक्रम
यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. बंडू रामटेके, छातीरोग तज्ञ डॉ. सौरभ राजूरकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिती राजगोपाल, एन.सी.डी जिल्हा समन्वयक डॉ. पद्मजा बोरकर, पी.एस. पोडे, रामेश्वर बारसागडे एन.सी.डी कर्मचारी व अधिपरिचारिका प्रामुख्याने उपस्थित होते.
आजच्या धावपळीच्या काळात नागरिकांनी त्यांचे आरोग्य जपावे, उच्च रक्तदाबामुळे हृदय धमन्याचे आजार, पक्षाघात यासारखे आजार होण्याची शक्यता अधिक असते. सध्याच्या परीस्थितीत प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. रक्तदाब नियंत्रणासाठी उपाय म्हणून नियमित रक्तदाबाची मोजणी करावी, रक्तदाब नियंत्रित ठेवावा. व्यायाम, प्राणायाम, योगा, सकस आहार इत्यादींचा अवलंब करावा. 30 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या शासकीय रुग्णालयात जाऊन रक्तदाबाची तपासणी करावी, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांनी उच्च रक्तदाब दिनाच्या पार्श्वभुमीवर रक्तदाबाचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी सी.पी.आर प्रशिक्षणात छातीरोग तज्ञ डॉ. सौरभ राजूरकर यांनी आकस्मिक रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी सीपीआर कसे द्यायचे, याबाबत जीवनरक्षक तंत्राचे प्रात्यक्षिक करून दाखविले. आपात्कालीन परिस्थितीत रुग्णाला आक्सीजन मिळू शकत नसल्यास छातीवर दाब देऊन किंवा तोंडाद्वारे श्वास देऊन जीव वाचवण्यासाठी जिल्हा प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालयातर्फे आरोग्य सेवकांना प्रशिक्षण देण्यात आले.
उच्च रक्तदाबामूळे हृदय विकाराचा झटका, पक्षाघात, हृदयाशी संबंधित आजार उद्भवू शकतात. त्यामुळे लवकरात लवकर निदान होऊन नियंत्रण करणे व लोकांमध्ये या आजाराबाबत जागृती व्हावी या उद्देशाने सदर प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत