मालवाहु चालकाचे अपहरण करनाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश
मालवाहु चालकाचे अपहरण करून जबरीने मालवाहु वाहनासह डिझेल चोरी करणाऱ्या टोळीचा ४८ तासात शोध घेवुन दरोड्याचा गंभीर गुन्हा उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा ला यश.
महा घादामोडी न्यूज नेटवर्क,वर्धा : फिर्यादी श्री सुनिल सुखदेवराव पाटील, रा. गोटे ले-आउट, सानेवाडी, वर्धा हे श्री प्रतिक दप्तरी यांचेकडे मालवाहु गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतात. दिनांक २१/०५/२०२२ रोजी ते त्यांचे ताब्यातील मालवाहु कॅम्पर गाडी क्र. एम.एच. ३२/ क्यु. २०४६ ने केळझर येथुन २ प्लॅस्टीक ड्रममध्ये ४०० लिटर डिझेल व २ प्लॅस्टीक डबक्यांमध्ये १० लिटर पेट्रोल घेवुन वर्धेकडे येत असतांना अंदाजे १३.०० वा. चे सुमारास मसाळा बायपास रोडवर एक पांढऱ्या रंगाची चारचाकी कार फिर्यादी यांचे वाहनासमोर आडवी लावुन त्यांना थांबविले.
त्यातील चार अनोळखी इसमांनी फिर्यादी यांना चाकुचा धाक दाखवुन त्यांना त्यांचे गाडीतुन उतरवुन आरोपीतांच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये बसविले व कान्होलीबारा येथील जंगलात सुनसान ठिकाणी नेवुन सोडुन दिले. फिर्यादीचे ताब्यातील १) मालवाहु बोलेरो कॅम्पर गाडी क्र. एम.एच. ३२/क्यु. २०४६ कि. २,५०,०००रु. २) ४०० लिटर डिझेल ड्रमसह कि. ४१,२००रु. ३) १० लिटर पेट्रोल कि. १२२० रु. ४) एक्साईड कंपनीची जुनी वापरती बॅटरी कि. २५०० रु. ५) एक मोबाईल कि. ५००रु. असा एकुण जु.की. २,९५,४२०/- रु. चा माल चारही अनोळखी आरोपीतांनी संगणमत क रून फिर्यादीचे ताब्यातुन जबरीने हिसकावुन दोन्ही गाडयांनी निघुन गेले. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पो.स्टे. सेवाग्राम येथे दिनांक २१/०५/२०२२ रोजी अप.क्र. २८४/२२ कलम ३९२, ३६५, ३४ भा.द.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्था. गु. शा. वर्धा द्वारे सुरु असतांना गोपनीय बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, सदरचा गुन्हा करण्याकरीता पांढऱ्या रंगाची जिचेवर दोन्ही बाजुंनी ग्राफीक्स असलेली स्विफ्ट डिझायर कार क्र. एम. एच. ३१/ए.ई. १५९९ चा वापर करण्यात आला असून सदरचा गुन्हा आरोपी १) सुरज चव्हाण रा. आमगांव (खडकी) २) सोम्या उईके. रा. महाबळा तसेच दोन विधी संघर्षित बालक यांनी मिळुन केला आहे. अशा माहीतीवरुन सदर गुन्ह्यातील आरोपी १) सुरज सहदेव चव्हाण, वय २० वर्ष, रा. आमगांव (खडकी) २) सोमेश वसंतरावजी उईके, वय २९ वर्ष. रा. महाबळा, ३) विकास उर्फ जितु नामदेवराव चामलाटे, वय २२ वर्ष, रा. पंजाब कॉलनी, वर्धा,
४) सागर अरविंदराव वाघाडे, वय २२ वर्ष, रा. गजानन नगर, वर्धा व २ विधी संघर्षीत बालक यांना ताब्यात घेवून गुन्ह्यासंबंधाने सखोल विचारपुस केली असता नमूद आरोपींनी सदर गुन्हा केल्याबाबत कबुली दिल्याने त्यांचे ताब्यातुन गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट कार कि. ४,००,०००/- रु. गुन्हा करण्याकरीता वापरलेले ४ मोबाईल कि. ३०,५००/- रु. जप्त केले तसेच गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल आरोपी नामे १) दिपक साहदेव चव्हाण, वय २२ वर्ष, २) सुनिल पुंडलिकराव बारबुध्दे, वय ४६ वर्ष, दोन्ही रा. गुरुकुंज मोझरी, ता. तिवसा जि. अमरावती यांचे कडुन गुन्हयात चोरीस गेलेले ४०० लिटर डिझेल कि. ४१.२००/- रु., चा जप्त करून तसेच आरोपीतांनी आवीं सावळापुर जंगल शिवारात सोडलेली मालवाहु कॅम्पर कि. २,००,००० रू. व एक बॅटरी कि. २५०० रु. असा जु.की. ६,७४,२०० रु. चा माल जप्त करून वर नमूद गुन्हा उघडकीस आणला.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात मा. पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. वर्धा श्री. संजय गायकवाड यांचे निर्देशाप्रमाणे सपोनि. महेंद्र इंगळे, पोउपनि, अमोल लगड, पोलीस अंमलदार निरंजन वरभे, गजानन लामसे, रणजित काकडे, यशवंत गोल्हर, राजेंद्र जयसिंगपुरे, रितेश शर्मा, अभिजीत वाघमारे, प्रदीप वाघ, गोपाल बावणकर, अमोल ढोबाळे, दिनेश बोथकर, अनुप कावळे, चालक अखिल इंगळे यांनी केली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत