Breaking News

रेल्वे संबंधी असणाऱ्या समस्या लवकर निकाली काढा- डॉ.मंगेश गुलवाडे

भाजपा महानगर चंद्रपूरच्या वतीने रेल्वे महाप्रबंधक यांना निवेदन सादर



महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर ; महाराष्ट्र विधीमंडळ लोकलेखा समिती प्रमुख आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी महानगर चंद्रपूरच्या वतीने मध्यरेल्वे चे महाप्रबंधक अनिल कुमार लाहोटी यांना निवेदन सादर करण्यात आले ते यावेळी चंद्रपूर रेल्वे स्टेशनच्या पाहणी साठी आले होते पदाधिकऱ्यांच्या वतीने सादर करण्यात आलेल्या निवेदनात उडिया मोहल्ला,सावरकर नगर व जलनगर वासियांना दिलासा देण्यासंदर्भात तसेच बल्लारशाह येथून मुंबई करीता नवीन गाडी त्वरीत सुरु करणे व नंदीग्राम एक्सप्रेस बल्लारशाह येथून सुरु करणे, 

काजीपेठ पुणे एक्स्प्रेस आठवड्यातून ३ दिवस बल्लारशाह येथून सुरू करणे आणि बल्लारशाह येथे २४ डब्यांच्या पिटलाईन मुळे भविष्यात बल्लारशाह येथून थेट गाड्या सोडण्यासाठी कार्यक्रम आखणी करणे व चंद्रपूर  ते चांदाफोर्ट लाईन चा सर्व्हे व तिसऱ्या रेल्वे लाईनच्या कामांना गती देणे इत्यादी समस्या रेल्वे महाप्रबंधक यांच्यापुढे माडण्यात आल्या.

 यावेळी भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.मंगेश गुलवडे यांनी महाप्रबंधक यांना चंद्रपूर जिल्हा हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो त्यामुळे वरील रेल्वे संदर्भात असणाऱ्या समस्या त्वरित सोडवून नागरिकांना दिलासा द्यावा असे यावेळी आवाहन त्यांनी केले सदर निवेदन सादर करतांना भारतीय जनता पार्टी महानगर महामंत्री ब्रिजभूषण पाझारे,सुभाष कासनगोट्टूवार, डॉ.भुपेश भलमे,सुहास अलमस्त,भाजपा महानगर सचिव राकेश बोमनवार,रामकुमार आकेपेलीवार,अमित निरंजने मनीष खापरे,रमेश चिटलवार शुभम बुटले,पंकज रामटेके यांची प्रामुख्याने उपस्थिती होती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत