Breaking News

करंजी त धान्याचा अवैध साठा जप्त

अन्न पुरवठा विभाग व पोलीस विभाग यांची संयुक्त कारवाही

९ कट्टे तांदूळ व २७ कट्टे गहू मुद्देमाल जप्त


महा घडामोडी न्युज जिल्हा प्रतिनिधी संतोष मडावी, चंद्रपूर ; गोंडपिपरी तालुक्यातील करंजी येथील एक व्यावसायिक रेशनचा तांदूळ काळा बाजरात विक्रीस नेत असताना मुद्देमालासह वाहन जप्त करण्यात आली.२ मे रोजी सकाळी १० वाजता दरम्यान झालेल्या या कार्यवाहीमुळे तालुक्यात व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.


गोंडपिपरी तालुक्यात स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा काळाबाजार करणारी टोळी सक्रिय आहे.या टोळीतील व्यापाऱ्यांना आपल्याकडील असणारा रेशन साठा कुठे लपवावा याची चिंता सतावू लागली आहे.यातच गोंडपिपरी तालुक्यात रेशनच्या तांदूळाची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.अशाच काळाबाजारात तांदूळ आणि गव्हाची विक्री करण्याच्या बेतात असलेल्या एका व्यापाऱ्याचा माल २ मे रोजी गोंडपिपरी पोलीस आणि अन्न पुरवठा विभागाने पकडला.व्यापाऱ्याच्या दारातून गाडी समोर निघाली असता मोक्यावर पोलीस धडकले.


.त्याचवेळी पोलिसांनी अन्न पुरवठा अधिकाऱ्याला पाचारण केले.दरम्यान पुरवठा निरीक्षक घटनास्थळी हजर होऊन प्रकरणाची चौकशी करून गाडीसह मालही जप्त केला.वाहनाची तपासणी केली असता त्यात ९ तांदुळ कट्टे आणि  २७ गव्हाचे कट्टे सुध्दा आढळून आले.या एकूण ३६ कट्ट्याने भरलेली गाडी गोंडपिपरी पोलीस स्टेशनमध्ये त्याचदिवशी जमा करण्यात आली. धान्य साठा आला कुठून, कुणी विकला या सर्व प्रकरणाची चौकशी आता अन्न पुरवठा विभाग करीत असून चौकशी पूर्ण होईपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून लवकरच चौकशी करून सदर प्रकरणाचा तपास करून कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस विभाग तसेच अन्न पुरवठा विभागाने दिली.तालुक्यात रेशन च्या तांदळाची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू असून करंजी येथील झालेल्या कारवाही ने तस्कराचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

अन्न पुरवठा विभागाकडून सदर प्रकरणाची चौकशी सुरू असल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले नाही.चौकशीत जे कुणी दोषी आढळून येणार त्याच्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
जीवन राजगुरू
ठाणेदार,पो.स्टे.गोंडपिपरी


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत