सोनी गावाजवळ बर्निंग दुचाकीचा थरार
सोनी गावाजवळ बर्निंग दुचाकीचा थरार
महा घडामोडी न्यूज नेटवर्क,नागपूर : नागपुर ते भंडारा राज्यमार्गावर सोनी गावाजवळ बर्निंग दुचाकीचा थरार मंगळवारी सकाळी पाहावयास मिळाला. इलेक्ट्रिक दुचाकी अवघ्या काही क्षणात जळून खाक झाली. सुदैवाने यात कुणाला दुखापत झाली नाही.
तालुक्यातील पाऊणगाव येथील कैलाश विठोबा चौधरी (वय ३०) हे मंगळवारी सायंकाळी गावाकडे येत होते. सोनी गावाजवळ इलेक्ट्रिक दुचाकीने पेट घेतला. हा प्रकार लक्षात येताच कैलाशने दुचाकीवरून उडी घेतली. काही क्षणातच दुचाकी पूर्णत: जळून खाक झाली. आग विझविण्यासाठी कोणतीही सुविधा नसल्याने अवघ्या काही वेळातच दुचाकी जळाली. या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत