Breaking News

जळीत रुग्णांच्या जीवघेण्या वेदना अजूनही कायमच

 जळीत रुग्णांच्या जीवघेण्या वेदना अजूनही कायमच



महा घडामोडी न्यूज नेटवर्क,नागपूर : आगीच्या घटना वाढत असताना विदर्भाच्या रुग्णांसाठी आशेचे केंद्र असलेल्या मेयो, मेडिकलमध्ये जळीत रुग्णांसाठी अद्ययावत सोयीचा वॉर्ड नाही. इतर रुग्णांना ज्या बेडवर ठेवले जाते त्याच बेडवर जळीत रुग्णांवर उपचार केले जात असल्याने त्यांना जीवघेण्या वेदनेला सामोर जावे लागते. 

यातच आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाचा प्रस्तावित 'नॅशनल प्रोग्राम फॉर प्रिव्हेशन अँड मॅनेजमेंट ऑफ बर्न इन्जुरिज' (एनपीपीएमबी) प्रकल्पही बारगळल्याने जळीत रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. जळालेल्या रुग्णांची विशेष काळजी घ्यावी लागत असल्याने २०१७ मध्ये आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालय, नवी दिल्लीने केंद्र शासनाच्या १२ व्या पंचवार्षिक योजनेंतर्गत एनपीपीएमबी' या प्रकल्पासाठी नागपूरच्या मेडिकलची निवड केली. 

या प्रकल्पासाठी निधीची तरतूदही केली; परंतु केंद्र व राज्य शासन यांच्यामध्ये या प्रकल्पाला घेऊन करारच झालेला नाही. यासाठी राज्य सरकारकडून पुढाकारही घेण्यात आला नसल्याने हा प्रस्ताव बारगळला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत