भंगाराची दुकाने स्थानांतरीत करण्यासाठी नागरिकांची आ.मुनगंटीवारांकडे धाव
भंगाराची दुकाने स्थानांतरीत करण्यासाठी नागरिकांची आ.मुनगंटीवारांकडे धाव
आ.मुनगंटीवारांचे मनपा प्रशासनाला पत्र
महानगर भाजपाचे शिष्टमंडळ भेटले आयुक्तांना.
या संदर्भातील आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे ते पत्र भाजपाच्या शिष्टमंडळाने मनपा अतिरिक्त आयुक्त विपीन पालिवाल यांना दिले असून मनपा प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले.या शिष्टमंडळात महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे,दत्तप्रसन्न महादाणी,मोनिशा महाताव,राकेश बोमनवार,अमित निरंजने,मनीष खापरे,सैनिष महातव,भावराव पेलणे,रोशन उसरे, विवेक मधुमटके, प्रिय जित यांची उपस्थिती होती.
घुटकाळा वार्ड निवासी व इतर नागरिकांनी अनिश
महातव व अन्य नागरिकांनी शहरातील पंचशिल वार्ड, बजाज शिवनकला ते चांदणी चौक या परिसरात अवैध भंगाराचे दुकाने असल्याची तक्रार आ. मुनगंटीवार यांचे कडे केली.सदर भंगाराच्या दुकानात गाळया व इतर कटींगचे काम गॅस सिलेंडरद्वारे करण्यात येत असल्याने, मोठा अपघात होण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे.सदर भंगाराची दुकाने रहिवासी भागात असून गुंड प्रवृत्तीचे व व्यसनाधीन व्यक्ती येथे येत असल्यामुळे त्याचा मुलांसुध्दा वाईट परिणाम होत आहे.
या परिसरात वृक्षारोपन केलेले झाडे भंगार व्यावसायीक कापुन ट्रिगार्ड नेत असल्यामुळे पर्यावरणास सुध्दा धोका निर्माण झाला आहे.महानगरपालिकेच्या बांधकाम केलेल्या नालीवर भंगाराचे साहीत्य ठेवले असुन अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे साफसफाई करता येत नाही तर डासांचा हैदोस वाढलेला आहे.
त्यामुळे येथील नागरिकांनी भंगार व्यावसायीकांना रहीवासी क्षेत्रातून अन्य ठिकाणी हटविण्याची विनंती केली आहे. त्याअनुषंगाने चौकशी करून आपले स्तरावरून नियमानुसार त्वरीत आवश्यक कार्यवाही करावी.या सुचनेकडे शिष्टमंडळाने लक्ष वेधले.मनपाने योग्य कारवाई न केल्यास महानगर भाजपा आंदोलन छेडेल,असा इशारा यावेळी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ.गुलवाडे यांनी दिला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत