Breaking News

तुमसर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस परीसंवाद मेळावा

 तुमसर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस परीसंवाद मेळावा

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी,नरेंद्र मेश्राम,भंडारा : राजाराम लॉन, तुमसर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस परीसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता, परिसंवाद मेळावा चे उद्घाटन आमदार राजू माणिकराव कारेमोरे तुमसर मोहाडी विधानसभा क्षेत्र यांच्या शुभहस्ते संपन्न झाला, कार्यक्रमाला ,आमदार राजू माणिकराव कारेमोरे, मधुकर कुकडे साहेब, यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

 त्यावेळी आमदार साहेबांना पुष्पगुच्छ शाल श्रीफळ देऊन त्यांचा स्वागत करण्यात आले, तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद सदस्य मोहाडी व तुमसर त्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रम आमदार साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले, सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, मुख्य प्रवक्ते अविनाश भारती कवी व कीर्तनकार यांनी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले होते, 

कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला त्यावेळी कार्यकर्त्यांना पक्षाच्या दुपट्टा, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले, कार्यक्रम त्याप्रसंगी आमदार राजू माणिकरावजी कारेमोरे, मधुकर कुकडे साहेब, विठ्ठल कहारकर, देवचंद ठाकरे, ठाकचंद मुंगूसमारे, रितेश वासनिक, आनंद मल्लेवार, महादेव पचघरे, एकनाथ फेंडर, राजू देशभ्रतार, राजेंद्र ढबाले, अनिता नलगोपलवार, सुषमा पारधी, पवन चव्हाण, सचिन गायधने,सुमन मेहर, मनीषा गायधने, शिशुपाल गौपाले, कविता गौपाले,

पिंटू तरारे,वंदना पराते, सोनू तरारे,बाना सव्वालाखे, उमेश भोगाडे, प्रीती शेन्डे, मनोज झरमुरे, सुमित गौपाले, आम्रपाली पटले, दिदमाला भौवसागर, मीनाक्षी शहारे, यासीन छवारे, योगेश सिंगनजुडे, सुनील थोटे, प्रदीप भरणेकर, राजेश मेहर, अनुप थोटे, सुभाष गायधने, बोधानंद गुरुजी, हिराचंद पुरामकर, संकेत गजभिये, व मंचावर आलेले सर्व सन्माननीय मान्यवर,प्रमुख पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, समाजसेविका, महिला भगिनी, बूथ प्रमुख, तुमसर मोहाडी तालुक्यातील युवक गण, शहरवासी, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, सर्व आजी माजी पदाधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत