Breaking News

८ ग्राम पंचायतीतील १६ जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर

 ८ ग्राम पंचायतीतील १६ जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर


महा घडामोडी न्यूज तालुका प्रतिनिधी,माहूर :
राजीनामा, अनर्हता, निधन, किंवा अन्य कारणामुळे रिक्त झालेल्या ग्राम पंचायतमधील पदांच्या पोट निवडणूकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. माहुर ८ ग्राम पंचायतीतील १६ जागांसाठी पोटनिवडणूक हेणार आहे.५ जून रोजी मतदान तर ६जून रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची नोटिस दिनाक ५ रोजी प्रसिद्ध केली आहे. 

  तालुक्यातील बंजारा तांडा, हिंगणी, दीगडी, लांजी, शेकापुर, चोरड, पाचुंदा, मालवाडा, पापलवाडी, या नऊ गावातील पैकी राखीव प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध नसल्याने १२ तर मयत ३, अनर्ह १, राजीनामा १ असे एकुण १७ जागा रिक्त होते, त्या पैकी पापलवाडी येथील जागा ही नामप्र प्रवर्गातील असल्याने त्या ठिकाणची पोट निवडणूक रद झाल्याने १७ पैकी १६ जागेची निवडणूक लागली आहे, उमेदवारांना नामनिर्देशन पत्रे १३ मे ते २० मे या कलावधीत १४ मे १५ मे तसेच १६ मे ची सार्वजनिक सुट्टी वगळून ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत या वेळेत सादर करण्यात येणार आहे. 

नामनिर्देशन पत्रांची छाननी २३ मे रोजी सकाळी ११ वाजल्यापासून होईल आणि छानणी संपेपर्यंत ही प्रक्रिया चालेल. नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक २५ मे असून वेळ दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजल्यानंतर निवडणूक चिन्ह नेमून देण्यात येऊन अंतिमरीत्या निवडणूक लढविणार्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. ५ जून रोजी मतदान तर ६ जून ला मतमोजणी होणार आहे. 

२५ गावातील सरपंच पदे रिक्त...

पेसा क्षेत्रातील २५ ग्रामपंचायत मध्ये आरक्षणानुसार आरक्षित प्रवर्गातील ग्रामपंचायत सदस्य नसल्याने तालुक्यातील तब्बल २५ सरपंचाची पदे रिक्त राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. प्रशासनाकडून पेसा क्षेत्रातील गावाच्या यादीत वर्षो न वर्षे बादल होत नसल्याने मागील अनेक वर्षापासून ही महत्वाची पदे रिक्त रहात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत