Breaking News

उमरेड-पवनी-कऱ्हाडला व बोर अभयारण्यात 16 व 17 मे रोजी निसर्गानुभव पर्यटन प्रेमींसाठी पर्वणी

 उमरेड-पवनी-कऱ्हाडला व बोर अभयारण्यात 16 व 17 मे रोजी निसर्गानुभव पर्यटन प्रेमींसाठी पर्वणी


महा घडामोडी न्यूज नेटवर्क,नागपूर ; बोर व्याघ्र प्रकल्प व उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यांतर्गत 16 मे 2022 रोजी निसर्गानुभव कार्यक्रम राबविण्यात येत असून या कार्यक्रमांतर्गत मचान बुकींगची सुविधा http://www.mahaecotourism.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. या मचान बुकींगसाठी दोन हजार रुपये प्रती मचान आकारणी करण्यात आली आहे.

निसर्गानुभव कार्यक्रमासाठी वन परिक्षेत्रनिहाय मचान याप्रमाणे उपलब्ध राहणार आहेत. उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यामध्ये कुही ( वन्यजीव ) 10 व एकूण मचान क्षमता 20 अशी आहे. पवनी ( वन्यजीव ) 8 व एकूण क्षमता 16, उमरेड ( वन्यजीव ) 10 व एकूण मचाण क्षमता 20 अशी आहे. बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये  बोर व नवीन बोर  ( वन्यजीव ) प्रत्येकी 10 व एकूण मचाण क्षमता 20 अशी आहे.

निसर्गानुभव कार्यक्रमांतर्गत अभयारण्य क्षेत्रातील मचाणावर 16 मे रोजी दुपारी 3 वाजेपासून तर दुसऱ्या दिवशी 17 मे रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत बसता येईल. निसर्गानुभव कार्यक्रमासाठी मचाणाचे वाटप विभागीय वन अधिकारी   (वन्यजीव), बोर अभयारण्य नागपूर या कार्यालयामार्फत करण्यात येईल. या कार्यक्रमासाठी मचाणवर अन्न व पाणी पुरविले जाईल. एका मचाणावर फक्त 2 व्यक्तीला बसता येईल. संरक्षित क्षेत्राचे नियम सर्व सहभागींना बंधनकारक असेल. सहभागींना मचाणपर्यंत वाहन नेता येणार नाही. सहभागी होणाऱ्या व्यक्तींचे कपडे निसर्गाशी समरस असावे.

सहभागींना मचाण निवड करता येणार नाही व बदल करता येणार नाही. मासाहार, धुम्रपान करण्यास मनाई आहे. प्रवेश घेण्यापूर्वी सर्व सहभागी व्यक्तींची तपासणी करण्यात येईल. तपासणीमध्ये काहीही आक्षेपार्ह असतु आढळल्यास संबंधितांची नोंदणी रद्द होईल, असे बोर अभयारण्य नागपूरचे विभागीय वन अधिकारी पी.बी. पंचभाई यांनी कळविले आहे. अधिक माहितीसाठी विभागीय वन अधिकारी कार्यालय, बोर अभ्यारण्य, नागपूर यांच्याशी संपर्क साधावा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत