Breaking News

घुग्घुस येथिल वर्धा नदीच्या पुलाखाली मृतदेह आढळला तरंगताना

घुग्घुस येथिल वर्धा नदीच्या पुलाखाली मृतदेह आढळला तरंगताना



महा घडामोडी न्यूज नेटवर्क,चंद्रपूर : चंद्रपुर तालुक्यातील घुग्गुस येथील वर्धा नदीत पवन कवडू रंगारी रा, बापुपेठ वय 32 वर्षिय अंदाजे, मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती घुग्गुस पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला तसेच मृतदेह पाण्याबरोबर काढून तपास सुरू केला आहे पवन कवडू रंगारी असे मृतक युवकाचे नाव आहे,

 

बेलोरा पुलाच्या वर्धा नदीमध्ये पवन रंगारी रा, बाबुपेठ असून इसमाचा शव काही नागरिकांना पाण्यात तरंगताना दिसून आला. त्यानंतर याची माहिती वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घुग्गुस येथील मच्छिमार यांच्या माध्यमातून तो मृतदेह पाण्याबाहेर काढला. 


हा मृतदेह 3 दिवसांचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून सध्या मृतदेह ची ओळख पवन कवडू असून, हि आत्महत्या आहे कि घातपात अशी चर्चा नागरिकांमध्ये होत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून घुग्घुस पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह चंद्रपुर सामान्य रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले पुढील तपास घुग्घुस पोलिस करीत आहे,

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत