Breaking News

हनुमान चालीसा म्हटल्यास जीवे मारू, नवनीत राणांना धमकीचा फोन

 हनुमान चालीसा म्हटल्यास जीवे मारू, नवनीत राणांना धमकीचा फोन


महा घडामोडी न्यूज नेटवर्क,दिल्ली : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांनी याबाबात नवी दिल्लीतील नॉर्थ अवेन्यू पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. राणा दाम्पत्यानं गेल्या काही दिवसांपासून हनुमान चालीसा मुद्दा लावून धरला होता. नवनीत राणा यांच्या फोनवर गेल्या दोन तीन दिवसात आठ ते नऊ वेळा फोन करण्यात आला होता.


 फोन करणाऱ्या व्यक्तीनं त्याचं नाव कादरी असल्याचं सांगितल्याचा दावा राणा दामप्त्यानं केला आहे. सार्वजनिकपणे हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न केल्यास जीवे मारु, अशी धमकी देण्यात आल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. नवनीत राणा यांनी त्या व्यक्तीनं फोनवरुन शिवीगाळ केल्याचा दावा करण्यात आला आहे. राणा दाम्पत्यानं आता नवी दिल्लीत तक्रार दाखल केली आहे.


गेल्या दोन तीन दिवसात धमकीचे फोन
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांनी गेल्या महिन्यापासून हनुमान चालीसा मुद्दा लावून धरला आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असललेल्या मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा त्यांनी केली होती. मात्र, त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली होती. 


नवनीत राणा आणि रवी राणा यांनी जामीन मिळाल्यानंतर १४ मे रोजी नवी दिल्लीत हनुमान चालीसा पठण केलं होतं. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी सातत्यानं हनुमान चालीसा पठणाचा मुद्दा लावून धरल्यानंतर गेल्या दोन तीन दिवसात त्यांना धमकीचे फोन आले आहेत.


नवनीत राणा यांच्या फोनवर कॉल करुन धमकी देण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. नवनीत राणा यांना सार्वजनिक ठिकाणी हनुमान चालीसा म्हटल्यास जीवे मारु अशी धमकी कादरी नावाच्या व्यक्तीनं दिल्याचं पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. नवनीत राणा यांना केंद्र सरकारनं गेल्या महिन्यात वाय दर्जाची सुरक्षा पुरवली होती. शिवसेना आणि नवनीत राणा यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सुरक्षा देण्यात आली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत