Breaking News

वा शासन, अच्छे दिन म्हणत, गरिबावर पुन्हा आणलीस चूल पेटवण्याची वेळ

 वा शासन, अच्छे दिन म्हणत, गरिबावर पुन्हा आणलीस चूल पेटवण्याची वेळ

सिलेंडर दरवाढीचा फटका. वनविभागा समोर पुन्हा वृक्षतोडीची समस्या.


महा घडामोडी न्युज तालुका प्रतिनिधी गणेश परचाके,पोंभुर्णा : घर धुर मुक्ति करण्यासाठी व जंगल तोड कमी करण्याच्या हेतूने शासनाने घरोघरी उज्वला योजनेच्या माध्यमातून गॅसचा मोफत पुरवठा केला. परंतु सिलेंडरच्या किंमतीत वाढ होत असल्याने महिलांना शेगडी वरून पुन्हा चूल पेटवण्याची वेळ आली आहे. घरगुती सिलेंडरच्या दरात ५० रुपयाने वाढ झाली सततची वाढणारी महागाई पाठ सोडत नसल्याने गोर गरिबांचे आर्थिक बजेट कोलमंडले आहे. 

महागाईने सर्वसाधारण माणसाचे जगणे कठीण केलेले आहे. करोना मुळे अनेकाचे रोजगार गेले आहे. संसाराचा गाडा कसा हाकलावा, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. अशातच सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्याने जनता त्रस्त झाली आहे.१०३० रुपये प्रति सिलेंडरचा असा दर झाला आहे. याच बरोबर जीवनावश्यक वस्तूच्या किमतीमध्ये मोठी वाढ झालेली आहे. 

या सर्व वस्तूच्या दरवाढीचा परिणाम सर्व सामान्यांवर होत आहे. सिलेंडर भाव वाढ ग्रामीण भागातील ग्रामस्थांना परवडणारी नसल्याने त्यांना पुन्हा एकदा शेगडी वरून चूलीकडे धाव घ्यावी लागत असल्याने चित्र ग्रामीण परिसरात दिसून येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत