Breaking News

टँकर घोटाळ्यातील आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला ...

 

टँकर घोटाळ्यातील आरोपींचा अटकपूर्व जामीन फेटाळला ...

अहमदनगर सत्र न्यायालयाचा निर्णय 


महा घडामोडी न्यूज प्रतिनिधी,अहमदनगर ; पारनेर तालुक्यात झालेल्या  टॅंकर  घोटाळ्यातील आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज  अहमदनगर   सत्र न्यायालयाने फेटाळला आहे .  पारनेर तालुक्यातील दुष्काळी गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी पारनेर येथील साई सहारा इंफ्रा  अँण्ड फॅसीलीटी प्रा . लि . या  कंपनीला जिल्हा प्रशासनाने सन २०१८ - १९ मध्ये कंत्राट दिले होते . या कंपनीने पाणीपुरवठा करताना  मोठा गैरव्यवहार केल्याचा आरोप निघोज येथील लोकजागृती सामाजिक संस्थेने केला होता . 

पुढे या सामाजिक संस्थेने याबाबतची तक्रार जिल्हा प्रशासन व राज्य शासनाकडे दाखल केली होती . त्यानंतर  राज्य शासनाने घोटाळ्याच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय  समिती नेमली  होती . या चौकशी समितीचा अहवाल उच्च न्यायालयासमोर ठेवण्यात आल्यानंतर ठेकेदार कंपनी विरोधात शासणाच्या फसवणूकीचा  गुन्हा दाखल करण्यात आला होता . 

 या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात लोकजागृती या संस्थेने जनहीत  याचिका दाखल केली होती .  गुन्हा दाखल झाल्यानंतर या घोटाळ्यातील आरोपींना  सत्र न्यायालयाकडुन तात्पुरता  अटकपूर्व जामीन  दिलेला होता . तो कायम  करण्यासाठी  त्यांनी  न्यायालयाकडे अर्ज  केला होता .

या  प्रकरणातील मूळ तक्रारदार यांनीही या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध करणारा हस्तक्षेप अर्ज न्यायालयासमोर दाखल केला होता . पोलिसांनीही  या प्रकरणात  बनावटगीरीची वाढीव कलमे लावुन   आरोपींचा  अटकपूर्व जामीन  कायम करण्याला  विरोध केला . अतिरीक्त सत्र न्यायाधीश माधुरी बरालिया यांच्यासमोर याबाबत  सुनावणी झाली . दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सत्र न्यायालयाने आज यातील सर्व आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे .  बनावट कागदपत्रे तयार करून सार्वजनिक निधिचा अपहार करणे , 

शासणाची फसवणून करणे  असे गंभीर आरोप आरोपींविरोधात आहेत . आरोपींकडुन   गुन्ह्यासाठी  वापरलेला मुद्देमाल हस्तगत करणे बाकी आहे .  आरोपींनी पुरावे नष्ट करू  नये तसेच  फिर्यादी व साक्षीदार  यांच्यावर  दबाव आणू नये म्हणून व  गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्यामुळे  तो कसा घडवला याबाबत तपासात  पोलिसांना  आरोपींच्या कोठडीची गरज असल्याचे म्हटले आहे . 

या गुन्ह्यातील आरोपींमध्ये सहारा कंपनीचा अध्यक्ष तथा राळेगण सिध्दी येथील  जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा  माजी सचिव सुरेश पठारे , कन्हैया दूध उद्योग समूहाचा संचालक  मच्छिंद्र लंके ,राळेगणसिद्धी येथील आदर्श ग्रामीण पतसंस्थेचा  उपाध्यक्ष दादाभाऊ पठारे , पारनेर  

नगर पंचायतीचा   बांधकाम समिती सभापती नितीन अडसुळ ,शिरुर नगर परिषदेचा  नगरसेवक  विठ्ठल पवार , राळेगण सिध्दी येथील  उद्योजक विठ्ठल गाजरे , पारनेर येथील उद्योजक अभय औटी यांचा समावेश आहे . मूळ तक्रार लोकजागृती सामाजिक संस्थेच्या वतीने  जेष्ठ वकील नवनाथ गर्जे तर सरकारी पक्षाच्या वतीने वकील अर्जुन पवार यांनी बाजू मांडली .


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत